Apurva Nemlekar : शेवंता 'शाहीनआपा'च्या भूमिकेत...
'रावरंभा' (Raavrambha) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआता या सिनेमासंदर्भात एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
आपल्या अभिनयाने आणि बिनधास्त स्वभावावाने कायम चर्चेत असणारी अण्णांची शेवंता 'रावरंभा' या सिनेमात शाहीनआपाच्या भूमिकेत दिसणार आहे.
अपूर्वाने शाहीनआपाचा लुक सोशल मीडियावर शेअर केला आहे.
फोटो शेअर करत तिने लिहिलं आहे,आतापर्यंत माझ्या वेगवेगळ्या भूमिकांवर तुम्ही अतोनात प्रेम केलं आहे. अशीच एक वेगळी भूमिका आता मी साकारली आहे. शाहीनआपा येतेय येत्या 12 मे ला प्रदर्शित होणाऱ्या 'रावरंभा' या सिनेमाच्या माध्यमातून.
शेवंताच्या भूमिकेतून घराघरात पोहोचलेली अपूर्वा आता एका अनोख्या अंदाजात दिसणार आहे.
आरस्पानी सौंदर्य आणि धारदार नजर यांचा सुरेख मिलाप असणारी करारी बाण्याची 'शाहीन आपा' ही भूमिका अपूर्वा लवकरच प्रदर्शित होणाऱ्या 'रावरंभा' या सिनेमात साकारणार आहे.
शाहीनआपाबद्दल बोलताना अपूर्वा म्हणाली,शिवछत्रपतींच्या कार्याला छुपी मदत करणारी 'शाहीन आपा' ही अतिशय महत्त्वपूर्ण ऐतिहासिक सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका करण्याचा योग जुळून आला असून या भूमिकेसाठी मी तितकीच उत्सुक होते.
गुरु ठाकूर आणि क्षितीज पटवर्धनने 'रावरंभा' या सिनेमातील गाणी लिहिली आहेत. गेल्या काही दिवसांपासून अनेक ऐतिहासिक सिनेमे प्रदर्शित झाले असून हे सिनेमे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. आता 'रावरंभा' या सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.