अल्लू अर्जुन-शाहरुख खानला विसरा; 'या' अभिनेत्यानं एका फिल्ममधून जेवढं कमावलं, त्यात तीन 'पुष्पा 2' बनतील
एका अभिनेत्यानं एका चित्रपटातून जगातील इतर कोणत्याही अभिनेत्यापेक्षा जास्त कमाई केली आहे. या अभिनेत्याच्या कमाईबद्दल जाणून घेतल्यावर, तुमच्या पायाखालची जमीन नक्कीच सरकेल.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसध्या अल्लू अर्जुन स्टारर पुष्पा 2 च्या कमाईची सर्वत्र चर्चा आहे. सर्वजण अल्लू अर्जुनच्या स्टारडमबद्दल बोलत आहेत. बॉक्स ऑफिस कलेक्शनच्या आकड्यांवर चर्चा करताना शाहरुख खानचीही बरीच चर्चा झाली. त्यानं गेल्या वर्षी म्हणजे, 2023 मध्ये जवान, पठाण आणि डंकी हे तीन मोठे चित्रपट दिलेत. तिघांनी मिळून जगभरात 2500 कोटींहून अधिक कमाई केली आहे.
असं करणारा शाहरुख खान भारतीय चित्रपट उद्योगातील पहिला अभिनेता ठरला, ज्यानं एका वर्षात 2500 कोटींचा व्यवसाय केला. फॉर्च्यून इंडियाच्या या वर्षीच्या यादीत सर्वाधिक टॅक्स भरणाऱ्यांमध्ये शाहरुख खान पहिल्या क्रमांकावर होता. त्यानं 92 कोटी रुपयांचा कर भरला. तसेच, अल्लू अर्जुननं यावर्षी पुष्पा 2 साठी 300 कोटी रुपये घेतल्याचंही वृत्त आहे.
कधी बातमी येते की, थलपथी विजय त्याच्या शेवटच्या चित्रपटासाठी 275 कोटी घेणार आहे, तर कधी बातमी येते की, प्रभास किंवा यशनं शंभर कोटी घेतले आहेत. पण थांबा, या आकडेवारीत जास्त अडकण्याची गरज नाही. कारण ज्या अभिनेत्याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, त्याच्या कमाईबद्दल ऐकल्यावर हे सगळे आकडे व्यर्थ ठरतील.
ज्या अभिनेत्याबद्दल आम्ही सांगणार आहोत, त्यानं एक असा विक्रम केला, जो अनेक दशकांपासून मोडीत निघालेला नाही. या अभिनेत्यानं एका चित्रपट निर्मितीतून 156 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच, सुमारे 1323 कोटी रुपये कमावले आहेत.
90 च्या दशकाच्या उत्तरार्धात, एक चित्रपट आला ज्यानं सर्वकाही बदललं. जगभरातील लोकांनी असं कधीच अनुभवलं नाही. आम्ही मॅट्रिक्स आणि त्याचा अभिनेता कीनू रीव्सबद्दल बोलत आहोत. 1999 मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटाच्या यशानंतर कीनू रीव्सनं भरपूर कमाई केली. यानंतर तो हॉलिवूडचा सर्वात महागडा अभिनेता म्हणून ओळखला जाऊ लागला.
फिल्म प्रोडक्शन कंपनी वॉर्नर ब्रदर्सनं मॅट्रिक्स फ्रँचायझी - द मॅट्रिक्स रीलोडेड आणि द मॅट्रिक्स रिव्होल्यूशन्सच्या आणखी दोन सिक्वेलसाठी त्याला साइन केलं. दोन्ही चित्रपट 2003 मध्ये प्रदर्शित झाले होते. या दोघांचं एकत्रित बॉक्स ऑफिस कलेक्शन 1.2 अब्ज डॉलर्स होतं. कीनूला चित्रपटांच्या नफ्यात वाटा देण्यात आला. तसेच, कीनूला चित्रपटाच्या भविष्यातील कोणत्याही कमाईमध्ये वाटा देण्याचं वचन दिलं होतं.
यानंतर हा चित्रपट पुन्हा ओटीटी आणि टीव्हीवर आला, ज्यामुळे कीनूनं या चित्रपटातून 156 दशलक्ष डॉलर्स कमावले. एकाच प्रोजेक्टमधून एवढी कमाई करणारा कीनू रीव्स हा एकमेव अभिनेता आहे.