Preity Zinta Became Mother Of Twins : जय आणि जिया; प्रीतीने दिला जुळ्यांना जन्म
Preity Zinta Became Mother Of Twins : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री प्रीती झिंटाने (Preity Zinta) नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. (photo : realpz/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appप्रीतीने जुळ्यांना जन्म दिला असून तिने मुलांची नावे सोशल मीडिया पोस्टद्वारे तिच्या चाहत्यांना सांगितली आहेत.(photo : realpz/ig)
सरोगसीच्या माध्यमातून प्रीतीने 46 व्या वर्षी जुळ्या मुलांना जन्म दिला.(photo : realpz/ig)
प्रीतीने सोशल मीडियावर पती जीन गुडइनफसोबतचा फोटो शेअर केला आहे.(photo : realpz/ig)
फोटोला प्रीतीने कॅप्शन दिले, 'सर्वांना नमस्कार, मला तुमच्या सर्वांसोबत एक आनंदाची बातमी शेअर करायची आहे. जीन आणि मी खूप आनंदी आहोत. आज आम्ही आमच्या कुटुंबात जय झिंटा गुडइनफ आणि जिया झिंटा गुडइनफ या जुळ्या मुलांचे स्वागत करत आहोत.' प्रीतीला एक मुलगा आणि एक मुलगी झाली असून तिने या पोस्टमधून डॉक्टर आणि नर्सचे आभार मानले आहेत.(photo : realpz/ig)
2016 मध्ये प्रितीने जीन गुडइनफसोबत लग्नगाठ बांधली. प्रीतीने 'दिल से' या चित्रपटामधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते.(photo : realpz/ig)