Google For India : YouTube Shortsचं नवं अॅप आणि बरंच काही... गूगलकडून महत्वाच्या घोषणा!
प्रत्येक वर्षी होणारा Google For India इव्हेंट आज सुरु झाला आहे. या इव्हेंटमध्ये गूगल इंडियाकडून भारतासाठी अनेक महत्वाच्या घोषणा केल्या आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगूगल आता लवकरच एक असं फीचर आणणार आहे. जे आपल्याला सर्च रिझल्टची माहिती वाचून दाखवणार आहे. ते देखील पाच वेगवेगळ्या भाषांमध्ये...
गूगलचं हे ग्लोबल फर्स्ट फीचर त्या लोकांना लक्षात घेऊन बनवलं आहे जे लोकं ऐकूण गोष्टी समजू इच्छितात.
फीचरअंतर्गत आपण गूगल असिस्टंटला सर्च रिझल्ट वाचून दाखवण्याची विनंती करु शकणार आहात.
हे फीचर ड्रायव्हिंगच्या वेळी देखील महत्वाचं ठरणार आहे.
ड्रायव्हिंगच्या वेळी आपल्याला कुठली माहिती हवी असेल तर आपण ती स्क्रिनकडे न पाहता ऐकू शकणार आहोत. हा सर्च रिझल्ट आपण पाच भाषांमध्ये ऐकू शकणार आहोत.
गूगलचं हे फीचर त्या लोकांसाठी फार महत्वाचं ठरणार आहे जे अंध आहेत. जे लोकं पाहू शकत नाहीत, वाचू शकत नाहीत त्यांना माहिती ऐकण्याची व्यवस्था या अॅपमुळं होणार आहे.
या कार्यक्रमात कंपनीनं गूगलच्या माध्यमातून कोरोना वॅक्सिनेशन साठी स्लॉट बुक करण्याच्या सुविधेची देखील घोषणा केली आहे. सोबतच गूगल सर्च, जीमेल, गूगल ड्राइव्ह आणि अन्य गूगल अॅप्सच्या अपडेटचीही माहिती दिली आहे.
या इव्हेंटमध्ये कंपनीनं Youtube Shorts हे अॅप देखील लॉन्च केलं आहे. आतापर्यंत हे एक फीचर यू-ट्यूब वर दिसायचं. मात्र आता याला वेगळ्या पद्धतीनं यूजर वापरु शकणार आहेत. हे एक टिकटॉक सारखं अॅप असणार आहे. इथं यूजर्स छोटे व्हिडीओ शूट करुन शेअर करु शकतील. इथं व्हिडीओची कमाल मर्यादा ही 60 सेकंदांची असेल.