Poonam Pandey : 'या' कारणाने पसरलेल्या पूनम पांडेच्या निधनाच्या अफवा!
लोकप्रिय अभिनेत्री, मॉडेल पूनम पांडे जिवंत आहे. तिच्या निधनाची बातमी 2 फेब्रुवारी 2024 रोजी समोर आली होती. त्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. (Photo credit : Instagram/@poonampandeyreal)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपण आता निधनाच्या अफवांना पूनम पांडेने पूर्णविराम दिला आहे. निधनाच्या अफवांदरम्यान अभिनेत्रीने सर्वायकल कॅन्सरसंदर्भातील एक व्हिडीओ शेअर केला आहे. (Photo credit : Instagram/@poonampandeyreal)
पूनम पांडेने व्हिडीओ शेअर करत लिहिलं आहे,तुमच्या सर्वांसोबत मला काही महत्त्वाचं शेअर करायचं आहे आणि ते म्हणजे - मी इथेच आहे, मी जिवंत आहे. मला गर्भाशयाचा कर्करोग झालेला नाही. परंतु, या रोगाचा सामना कसा करायचा याची माहिती नसल्यामुळे हजारो महिलांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. (Photo credit : Instagram/@poonampandeyreal)
पूनमने पुढे लिहिलं आहे,इतर प्रकारच्या कॅन्सरप्रमाणेच, सर्व्हायकल कॅन्सर देखील पूर्णपणे टाळता येण्याजोगा आहे. लवकर या कर्करोगाचं निदान होणं आणि त्यावर HPV लस घेणं हा त्यावरचा उपाय आहे. या आजारामुळे कोणालाही आपला जीव गमवावा लागणार नाही, याची खात्री आपण केली पाहिजे. (Photo credit : Instagram/@poonampandeyreal)
या रोगाबद्दल जागरुकता पसरवून एकमेकांना सशक्त बनवूया आणि प्रत्येक स्त्रीला यावरील उपायांबद्दल माहिती मिळेल, याची खात्री करुया. चला एकत्रितपणे रोगाच्या विनाशकारी परिणामांचा अंत करण्यासाठी प्रयत्न करूया आणि #DeathToCervicalCancer चा अवलंब करुया.असे तिने पोस्टमध्ये लिहिले आहे. (Photo credit : Instagram/@poonampandeyreal)
पूनम पांडेने 2 फेब्रुवारी 2024 रोजी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. (Photo credit : Instagram/@poonampandeyreal)
या पोस्टमध्ये तिने लिहिलं होतं,आजची सकाळ आपल्या सर्वांसाठी खूपच धक्कादायक आहे. कॅन्सशी झुंझ देणारी आपली लाडकी पूनम आपल्याला सोडून गेली. तिला सर्वायकल कॅन्सर म्हणजेच गर्भाशयाचा कर्करोग होता असं तिने तिच्या पोस्टमध्ये लिहिलं होतं. (Photo credit : Instagram/@poonampandeyreal)
पूनम पांडेच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर एकीकडे चाहत्यांना मोठा धक्का बसला तर दुसरीकडे नेटकऱ्यांनी हा पब्लिसिटी स्टंट आहे, अशी शक्यता वर्तवली होती. (Photo credit : Instagram/@poonampandeyreal)
जागतिक कर्करोग दिनानिमित्त तिने ही पोस्ट केली असेल, असाही अंदाज बांधला जात होता. आता अभिनेत्रीने व्हिडीओ शेअर करत या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. (Photo credit : Instagram/@poonampandeyreal)
निधनाची बातमी येण्याच्या दोन दिवस आधीपर्यंत पूनम शूटिंग करत होती. (Photo credit : Instagram/@poonampandeyreal)