पवन कल्याणच्या पहिल्या पत्नीने केला होता फसवणुकीचा आरोप, अभिनेत्याला भरावा लागला होता कोट्यवधींचा दंड
या अभिनेत्याने एक नाही दोन नाही तब्बल तीन लग्न केलेली आहेत. रिपोर्ट्सनुसार, पवन कल्याणने सिनेसृष्टीत पाऊल ठेवल्यानंतर एका वर्षाने म्हणजेच 1997 मध्ये नंदिनीसोबत लग्नगाठ बांधली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरिपोर्ट्सनुसार, पवन कल्याणने सिनेसृष्टीत पाऊल ठेवल्यानंतर एका वर्षाने म्हणजेच 1997 मध्ये नंदिनीसोबत लग्नगाठ बांधली आहे.
पण 2001 मध्ये ते दोघेही वेगळे राहायला लागले. त्यांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही.
पण नंदिनीने 2007 मध्ये पवन कल्याण विरोधात तक्रार दाखल केली होती.
तेव्हा विवाहित असूनही अभिनेत्री रेणु देसाईसोबत दुसरं लग्न केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला.
पण पवान कल्याणने हे आरोप साफ फेटाळून लावले आणि ते दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याचं म्हटलं होतं.
अखेरीस, 2008 मध्ये, पवन कल्याण आणि नंदिनीचा घटस्फोट झाला आणि अभिनेत्याला त्याच्या पहिल्या पत्नीला 5 कोटी रुपये नुकसान भरपाई द्यावी लागली होती.
पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेतल्यानंतर पवन कल्याणने 2009 साली रेणू देसाईसोबत लग्न केले.
पवन कल्याण आणि रेणू यांचे नाते काही सुरळीत झाले नाही आणि लग्नाच्या तीन वर्षानंतर 2012 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.