In Pics | 'कुछ कुछ होता है' मधील 'तुस्सी ना जाओ', असं म्हणणारा तो लहानगा आठवतोय?
शाहरुख खान, काजोल, राणी मुखर्जी, परेश रावल, फरीदा जलाल यांच्या भूमिकांनी सजलेला एव्हग्रीन चित्रपट 'कुछ कुछ होता है', आजही अनेकांच्या सर्वाधिक आवडीचा चित्रपट. फक्त मुख्य कलाकारच नव्हे, तर चित्रपटातील प्रत्येक कलाकाराची भूमिका चाहत्यांना मनावर अधिराज्य गाजवून गेली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअशीच भूमिका म्हणजे परजान दस्तूर या बालकलाकाराची, अर्थात 'तुस्सी जा रहे हो तुस्सी ना जाओ', असं अतिशय निरागसपणे म्हणणाला लहानगा सरदारही प्रेक्षकांच्या स्मरणात राहिला.
सध्या सोशल मीडियावर परजान एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आहे.
ही चर्चा आहे त्याच्या पत्नीसह सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेले काही फोटो.
परजाननं महिन्याभरापूर्वीच त्याची प्रेयसी डेलना श्रॉफ हिच्याशी लग्नगाठ बांधली.
वैवाहिक जीवनाच्या प्रवासाला एक महिना पूर्ण होण्याच्या निमित्तानं त्यानं सोशल मीडियावर विवाहसोहळ्यातील काही खास फोटो शेअर केले.
शेअर करण्यात आलेल्या फोटोंमध्ये दोघंही पारंपरिक पारसी वेशभूषेमध्ये दिसत आहेत. चाहत्यांची नजर या फोटोंवर पडताच या जोडीवर सर्वांनीच शुभेच्छांचा वर्षाव केला. (सर्व छायाचित्र- इन्स्टाग्राम)