प्रेमात कोणाला मिळाला धोका? अन् कोणी फसवलं जोडीदाराला?

सुष्मिता सेन

1/9
सुष्मिता सेन - मिस युनिव्हर्स बनून सर्वांच्या हृदयावर राज्य करणारी या सुंदर अभिनेत्रीचं हृदयही बर्‍याचदा तुटलं आहे. सुष्मिता विक्रम भट्ट आणि रणदीप हूडासोबत रिलेशनशिपमध्ये होती. पण प्रत्येकवेळी तिचे मन तुटलं. सुष्मिता सध्या मॉडेल रोहमन शॉलला डेट करत आहे.
2/9
दीपिका पादुकोण - दीपिका आणि रणबीर कपूर अनेक प्रोजेक्टमध्ये एकत्र काम केल्यानंतर एकमेकांच्या जवळ आलेत. हे बी टाऊनमधील सर्वाधिक चर्चेत असलेलं जोडपं आहे. पण दीपिकाच्या म्हणण्यानुसार रणबीरने तिची फसवणूक केली. त्यानंतर ती आतून खूप तुटली होती.
3/9
मीडिया रिपोर्टनुसार दीपिका रणबीर बरोबर ब्रेकअप झाल्यानंतरच नैराश्यात गेली होती. दीपिकाने एका मुलाखतीत सांगितले होते की तिने आपल्या प्रियकराला रेडहँड पकडले होते.
4/9
या यादीत बंगाली बाला बिपाशा बासू हिचेही नाव घ्यावं लागेल. बिपाशा आणि जॉन अब्राहमचे नाते जवळपास 10 वर्षे टिकले. या दोघांच्या नात्याची सुरुवात जिस्म चित्रपटापासून झाली होती. पण, जेव्हा दोघे वेगळे झाले तेव्हा सर्वांनाच धक्का बसला.
5/9
या ब्रेकअपचे कारण जॉन अब्राहम आणि प्रिया रुंचालची वाढत असलेली जवळीक असल्याचे मीडिया रिपोर्टमध्ये प्रसिद्ध झाले आहे. मात्र, हे दोघे का वेगळे झाले याविषयी त्यांनी कधीही काही सांगितले नाही.
6/9
शिल्पा शेट्टीदेखील अशा नायिकांपैकी एक आहे, ज्यांना प्रेमात खोलवर दुखापत झाली. आणि ज्या व्यक्तीने ही जखम दिली त्याचे नाव अक्षय कुमार होते. एकेकाळी शिल्पा अक्षयच्या प्रेमात आकंठ बुडाली होती. दोघांच्या लग्नाच्याही बातम्या आल्या. पण, मग अचानक सर्व काही बदलले.
7/9
शिल्पाला समजले की अक्षय ट्विंकल खन्नाला डेट करत आहे. त्यानंतर तिची सर्व स्वप्ने धुळीस मिळाली.
8/9
रवीना टंडनदेखील त्याच व्यक्तीमुळे दुःखी झाली. ज्यामुळे शिल्पा शेट्टी. अक्षय कुमारशी रवीना टंडन हिचेही जवळचे नाते होते. त्यावेळी अशा बातम्याही आल्या होत्या की या दोघांचाही साखरपुडा झाला आहे आणि लवकरच तेही लग्नाच्या बंधनात अडकणाप आहेत, पण अक्षयनेही या अभिनेत्रीचेही हृदय तोडले.
9/9
कंगना रनौत - पंगा क्वीन कंगनाबद्दल आपण काय बोलायचं? हृतिक रोशनसोबतच्या रिलेशनशीपवरुन आजपर्यंत हे दोन्ही स्टार चर्चेत राहिले आहेत. कंगना हृतिकसोबत प्रेमसंबंध ठेवण्याविषयी बोलत असताना दुसरीकडे हृतिक मात्र या गोष्टी सरळपणे फेटाळून लावतोय.
Sponsored Links by Taboola