Netflix Top 10 Movies List: फक्त 199 रुपये भरा अन् Netflix वर मनोरंजनाची मेजवानी अनुभवा!
Netflix Top 10 Movies List: तुम्ही मनोरंजनासाठी एखाद्या चांगल्या सीरिजच्या शोधात असाल, तर Netflix वर टॉप 10 मध्ये ट्रेंड करत असलेल्या 10 अप्रतिम चित्रपटांची यादी घेऊन आलो आहोत.

Netflix Top 10 Movies List
1/11
नेटफ्लिक्सने अलीकडेच या आठवड्यात सर्वाधिक वेळा पाहिल्या गेलेल्या 10 चित्रपटांची यादी प्रसिद्ध केली आहे. ज्यात काही नव्या, तर काही जुन्या चित्रपटांचा समावेश आहे.
2/11
Saripodha Sanivaram: तुम्ही हा चित्रपट Netflix वर पाहू शकता, जो एका विमा एजंटचा राग दाखवतो. तुम्हाला साऊथ सिनेमाचा पुरेपूर आनंद मिळेल. या यादीत हा चित्रपट दहाव्या क्रमांकावर आहे.
3/11
फॅमिली पॅक: जर तुम्हाला जुमांजी सारख्या चित्रपटांची आवड असेल, तर तुम्हाला हा फ्रेंच चित्रपट आवडेल. त्याला या यादीत नववं स्थान मिळालं आहे. याचा आनंद तुम्ही कुटुंबासह घेऊ शकता.
4/11
गोट: थलपथी विजयचा सुपरहिट चित्रपट नेटफ्लिक्सवरही आला आहे. टॉप 10 ट्रेंडिंग चित्रपटांच्या यादीत याला आठवं स्थान मिळालं आहे. उत्तम ॲक्शन पाहण्यासाठी तुम्ही हा चित्रपट पाहू शकता.
5/11
भूल भुलैया: कार्तिक आर्यनचा भूल भुलैया 3 सिनेमागृहांमध्ये गाजत आहे, त्याच फ्रेंचायझीचा पहिला चित्रपट, भूल भुलैया (2007) नेटफ्लिक्सवर टॉप 10 मध्ये 7 वा क्रमांक मिळवून प्रेक्षकांना गुदगुल्या करत आहे. हा चित्रपट तुम्ही कुटुंबासह पाहू शकता.
6/11
खेल खेल में : अक्षय कुमार, एमी विर्क आणि फरदीन खान सारख्या अभिनेत्यांच्या या चित्रपटाला चित्रपटगृहांमध्ये फारसा प्रतिसाद मिळाला नाही, पण, नेटफ्लिक्सवर येताच या चित्रपटाला प्रेक्षकांचं प्रेम मिळत आहे. यामुळेच,या 10 चित्रपटांच्या यादीमध्ये खेल खेल में सहाव्या क्रमांकावर आहे.
7/11
Transformers: Rise of the Beasts : 2023 मध्ये जगभरातील थिएटर गाजवल्यानंतर, हा चित्रपट नुकताच नेटफ्लिक्सवर आला आहे. जर तुम्हाला ट्रान्सफॉर्मर्स फ्रँचायझी आवडत असेल, तर हा चित्रपट तुम्हाला नक्की आवडेल. या यादीत चित्रपटाला पाचवं स्थान मिळालं आहे.
8/11
डोन्ट मूव्ह: तुम्ही नेटफ्लिक्सवर या थ्रिलर चित्रपटाचा आनंद घेऊ शकता. डोंट ब्रीदच्या निर्मात्यांनी हा चित्रपट बनवला आहे, त्यामुळे हाच थरार चित्रपटातही जाणवणार आहे. या यादीत त्याला चौथं स्थान मिळालं आहे. हा चित्रपट एका मारेकऱ्यावर आधारित आहे, जो आपले शिकार निवडतो आणि त्यांना अतिशय भयानक पद्धतीनं मारतो.
9/11
टाईम कट: हा चित्रपट 2024 ते 2003 या काळातील एका टीनएजर मुलीची कथा आहे. टाईम ट्रॅव्हलवर आधारित या चित्रपटाला ट्रेंडिंग लिस्टमध्ये तिसरं स्थान मिळालं आहे.
10/11
मीयाझागन: तुम्ही नेटफ्लिक्सवर कार्ती आणि अरविंद स्वामी यांसारख्या स्टार्स अभिनीत या तमिळ चित्रपटाचा आनंद घेऊ शकता. हा इमोशनल ड्रामा नेटफ्लिक्स चित्रपटाच्या ट्रेंडिंग लिस्टमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे.
11/11
दो पत्ती : काजोल आणि कृती सेनॉनचा हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. नेटफ्लिक्सवर हा चित्रपट पहिल्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे. या चित्रपटात कृती सेननची दुहेरी भूमिका आहे. तुम्हीही या थ्रिलर चित्रपटाचा आनंद घेऊ शकता.
Published at : 05 Nov 2024 08:52 AM (IST)