Team India: रोहित शर्माचा पत्ता कट होणार; कसोटी संघाच्या कर्णधारपदासाठी दोन नावाची चर्चा
न्यूझीलंडविरुद्ध मालिका गमावल्यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध डब्ल्यूटीसीतील शेवटची कसोटी मालिका खेळणार आहे. (Image Credit-BCCI)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन या चार ज्येष्ठ खेळाडूंपैकी किमान दोन खेळाडूंसाठी ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका अंतिम ठरण्याची शक्यता आहे.(Image Credit-BCCI)
रोहित शर्मानंतर कसोटी संघाचा कर्णधार कोण असणार याची चर्चा सध्या रंगली आहे. (Image Credit-BCCI)
टीम इंडियाच्या कसोटी संघाचा जसप्रीत बुमराह सध्या उपकर्णधार आहे. परंतु बुमराह सर्वंच कसोटी मालिका खेळेल असं नाही. त्यामुळे बुमराहला कर्णधारपद देईल, अशी शक्यता दिसत नाही. (Image Credit-BCCI)
रोहित शर्मानंतर कसोटी संघाच्या कर्णधारपदासाठी ऋषभ पंत आणि शुभमन गिलच्या नावाची चर्चा सुरु आहे. (Image Credit-BCCI)
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर बीसीसीआय याबाबत निर्णय घेणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे. (Image Credit-BCCI)