OTT Release December 3rd Week: डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात एन्टरटेन्मेंटची मेजवानी; OTT वर रिलीज होणार 'या' फिल्म, सीरिज
डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक शो आणि सीरिज रिलीज होत आहेत. हादरवून सोडणाऱ्या डॉक्युमेंट्रीपासून कॉमेडी ड्रामापर्यंत, डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात अनेक ओटीटी फिल्म्स आणि वेब सीरिज रिलीज होणार आहेत. या आठवड्यात, 16 ते 22 डिसेंबर 2024 दरम्यान, हिंदीपासून इंग्रजी आणि मल्याळम आशयाच्या अनेक सीरिज आणि चित्रपट प्रदर्शित होत आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appप्रीती पाणिग्रही, केसव बिनॉय किरण आणि कानी कुसरुती स्टारर, गर्ल्स विल बी गर्ल्स हा शुचि तलाटी दिग्दर्शित इंडो-फ्रेंच ड्रामा चित्रपट आहे. हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या एका कडक बोर्डिंग स्कूलमध्ये राहणाऱ्या 16 वर्षीय मीराची ही कथा आहे. हा चित्रपट 18 डिसेंबर रोजी OTT प्राइम व्हिडिओवर रिलीज होणार आहे.
यो यो हनी सिंह हा पंजाबी चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रसिद्ध चेहरा आहे. यो यो हनी सिंह ही प्रसिद्ध डॉक्युमेंट्री हनी सिंगच्या जीवनाभोवती फिरते, ज्यामध्ये असामान्य स्वप्न असलेल्या एका सामान्य मुलाची कथा दाखवण्यात आली आहे. यो यो हनी सिंग ही डॉक्युमेंट्री 20 डिसेंबर 2024 रोजी नेटफ्लिक्सवर प्रसिद्ध होणार आहे.
मल्याळम चित्रपट 'पाणी' हा एका विवाहित जोडप्यावर आधारित आहे, ज्यांचं आयुष्य दोन गुन्हेगारी स्वभावाच्या तरुणांमुळे विस्कळीत होतं. या चित्रपटात जोजू जॉर्ज, सागर सूर्या, मर्लेट ॲन थॉमस, बॉबी कुरियन, जुनेझ व्हीपी आणि अभिनय यांच्या प्रमुख भूमिका आहेत. पाणी 20 डिसेंबर रोजी सोनी लिव्हवर प्रदर्शित होणार आहे.
अमेरिकन वॉर ड्रामा द सिक्स ट्रिपल एट 855 महिलांभोवती फिरतं, जे तीन वर्षांपासून डिलीवर न झालेल्या मेलचा बॅकलॉग ठिक करण्यासाठी युद्धात सामील होतात. त्यांना भेदभावाचा सामना करावा लागला तरीही त्या दिलेल्या वेळेपूर्वी 17 दशलक्ष मेल्स सॉर्ट करतात. या चित्रपटात केरी वॉशिंग्टन, ओप्राह विन्फ्रे, एबोनी ओब्सिडियन, साराह जेफरी, मोरिया ब्राउन आणि मिलौना जॅक्सन यांच्या भूमिका आहेत. सिक्स ट्रिपल एट 20 डिसेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
तेलुगू ॲक्शन थ्रिलर चित्रपट फसवणूक करणाऱ्यांच्या एका गटाची कथा सांगतो, जे एक दरोडा टाकण्याचा प्लान आखतात. या चित्रपटात प्रिया भवानी शंकर, सत्य देव, जेनिफर पिकिनाटो, डाली धनंजय, अमृता अय्यंगार, सत्यराज आणि कल्याणी नटराजन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. एका महिन्यापेक्षा कमी कालावधीनंतर हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. झेब्रा 20 डिसेंबर 2024 रोजी AHA वर प्रवाहित होईल.
मूनवॉकची कथा दोन चोरांच्या जीवनावर आधारित आहे. या शोमध्ये समीर कोचर, अंशुमन पुष्कर आणि निधी सिंह मुख्य भूमिकेत आहेत. मूनवॉक 20 डिसेंबर 2024 रोजी जिओ सिनेमावर प्रदर्शित होईल.
मेकॅनिक रॉकी डिसेंबर 2024 च्या तिसऱ्या आठवड्यात OTT वर देखील रिलीज होईल. तेलुगू ॲक्शन-कॉमेडी स्टार विश्वक सेन यांच्यासोबत मीनाक्षी चौधरी आणि श्रद्धा श्रीनाथ मुख्य भूमिकेत आहेत. मेकॅनिक रॉकी 20 डिसेंबरला प्राईम व्हिडीओला रिलीज होणार आहे.