IPO Update : धनलक्ष्मी क्रॉप सायन्सच्या आयपीओतून गुंतवणूकदार मालामाल,लिस्टींगलाच पैसे दुप्पट,100 टक्के परतावा
Dhanlaxmi Crop Science : धनलक्ष्मी क्रॉप सायन्स या कंपनीचा एसएमई आयपीओ लिस्ट झाला. पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना दुप्पट परतावा मिळाला आहे.

धनलक्ष्मी क्रॉप सायन्स आयपीओ
1/6
धनलक्ष्मी क्रॉप सायन्स या कंपनीचा एसएमई आयपीओ आज एनएसईवर लिस्ट झाला आहे. लिस्टींगला गुंतवणूकदारांना 90 टक्के परतावा मिळाला. त्यानंतर शेअरमध्ये 5 टक्के वाढ झाल्यानं शेअर 109.70 रुपयांवर पोहोचला.
2/6
धनलक्ष्मी क्रॉप सायन्स या कंपनीचा आयपीओ गुंतवणुकीसाठी 9 डिसेंबरला खुला झाला होता. तो 11 डिसेंबरपर्यंत खुला होता. या कंपनीला आयपीओच्या माध्यमातून 23.80 कोटी रुपयांची उभारणी करायची होती.
3/6
धनलक्ष्मी क्रॉप सयन्स वेगवेगळ्या प्रकारच्या पिकांच्या आणि भाजीपाल्याच्या बीज निर्मिती क्षेत्रात काम करते. धनलक्ष्मी क्रॉप सायन्स या कंपनीचा आयपीओ 104.50 रुपयांवर लिस्ट झाला होता. त्यानंतर त्यामध्ये 5 टक्क्यांची वाढ झाली.
4/6
धनलक्ष्मी क्रॉप सायन्स या कंपनीनं आयपीओचा किंमतपट्टा 55 रुपये निश्चित केला होता. त्यानुसार गुंतवणूकदारांना दुप्पट परतावा मिळाला आहे. धनलक्ष्मी क्रॉप सायन्समधील प्रमोटर्सची भागिदारी 76.70 वरुन 56.37 टक्क्यांवर पोहोचली आहे.
5/6
धनलक्ष्मी क्रॉप सायन्स कंपनीचा एसएमई आयपीओ 555.83 पट सबस्क्राइब झाला होता. रिटेल गुंतवणूकदारांनी 441.18 पट सबस्क्राइब केलं होतं. गैर संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 1241.27 पट सबस्क्राइब केला. मान्यताप्राप्त संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 167.65 पट सबस्क्राइब केला होता.
6/6
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
Published at : 16 Dec 2024 11:21 AM (IST)