OTT Release: 'ब्लॅक वॉरंट' ते 'द साबरमती रिपोर्ट'पर्यंत; 'या' आठवड्यात OTT वर एंटरटेनमेंटचा ओव्हरडोस
दर आठवड्याला अनेक चित्रपट आणि सीरिज ओटीटीवर प्रदर्शित होत असतात. जानेवारी 2025 च्या दुसऱ्या आठवड्यात, गुन्हेगारीपासून कॉमेडी आणि सस्पेन्सपर्यंत अनेक चित्रपट आणि सीरिज OTT वर प्रदर्शित होत आहेत. या कडाक्याच्या थंडीत तुम्ही घरी आरामात बसून याचा आनंद घेऊ शकता. या आठवड्यात डिजिटल प्लॅटफॉर्मवर कोणते शो आणि चित्रपट येत आहेत, ते सविस्तर पाहुयात...
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appधीरज सरना दिग्दर्शित 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटात विक्रांत मेस्सी, राशी खन्ना आणि रिद्धी डोगरा यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे. 2002 मध्ये गुजरातमधील गोध्रा घटनेचं वास्तव मांडणारा हा चित्रपट काही काळासाठी वादाच्या भोवऱ्यातही अडकला होता. हा चित्रपट 10 जानेवारी रोजी OTT प्लॅटफॉर्म Zee5 वर प्रदर्शित होत आहे.
विक्रमादित्य मोटवानी दिग्दर्शित ब्लॅक वॉरंट या सीरिजमध्ये जहाँ कपूर, राहुल भट्ट, परमवीर सिंह चीमा, अनुराग ठाकूर आणि सिद्धांत गुप्ता यांच्यासह अनेक कलाकार दिसणार आहेत. या सीरिजची कथा तिहार जेलवर आधारित आहे. ही सीरिज 10 जानेवारी रोजी OTT प्लॅटफॉर्म Netflix वर दाखल होईल.
गूजबम्प्स द व्हॅनिशिंगच्या दुसऱ्या इंस्टॉलमेंटची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. डेव्हिड श्विमर अभिनीत ही हॉरर सीरिज 10 जानेवारी रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.
ड्रामा आणि ॲक्शननं भरलेल्या ॲड व्हिटममध्ये गुइलॉम कॅनेट, स्टेफेन कॅलॉर्ड आणि नसिम ल्यास महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत. ही सीरिज 10 जानेवारी रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
1979 मध्ये घेऊन जाणारी असुर ही चार बहिणींची कथा आहे, ज्यांच्या वडिलांचे प्रेमसंबंध कळल्यावर त्यांच्या आयुष्यात प्रचंड उलथापालथ होते. या सीरिजमध्ये रे मियाजावा, माचिको ओनो आणि जोलेन किम यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. असुर 9 जानेवारीला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
ट्रॉयन बेलिसारियो, ब्रँडन लॅराक्युएन्टे आणि एरिक ला सॅल्ले अभिनीत, ऑन कॉल, कॅलिफोर्नियातील दोन पोलीस अधिकाऱ्यांची कथा आहे, ट्रेसी हार्मन (बेलिसारियो) आणि ॲलेक्स डायझ (लॅराक्युएंटे). हा चित्रपट प्राईम व्हिडीओवर 9 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.
ब्रेकथ्रू हे पीटर एगर्स आणि मॅटियास नॉर्डक्विस्ट यांच्या नॉन-फिक्शन पुस्तकावर आधारित आहे, ज्यामध्ये एक धक्कादायक दुहेरी हत्या प्रकरण 16 वर्षे अनुत्तरीत आहे. मग एक गुप्तहेर आणि एक वंशावळी सत्य शोधण्यासाठी एकत्र येतात, चार भागांची मालिका खूपच चमकदार आहे. तो नेटफ्लिक्सवर 7 जानेवारीला प्रदर्शित झाला.