Sam Konstas Salary : विराटशी पंगा घेणाऱ्या 19 वर्षीच्या पोरांचा पगार कोटींनी वाढला! एका सामन्यासाठी घेणार इतके पैसे? वाचून थक्क व्हाल!
ऑस्ट्रेलियाचा 19 वर्षीय खेळाडू सॅम कॉन्स्टास बॉर्डर-गावसकर ट्रॉफीदरम्यान प्रसिद्धीच्या झोतात आला होता. मेलबर्न कसोटीत त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. कारकिर्दीतील पहिल्या डावात त्याने 60 धावांची धडाकेबाज खेळी खेळून खळबळ उडवून दिली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयाशिवाय त्याने विराट कोहलीशी पंगा घेतल्यानंतर तो जास्त चर्चेत आला. त्यानंतर शेवटच्या सिडनी कसोटीत तो जसप्रीत बुमराहशी भिडला. दरम्यान, एक नवीन अपडेटसमोर आली आहे, ज्यामध्ये त्याच्या पगार कोटींनी वाढला आहे.
वर्ल्ड क्रिकेटमध्ये त्याची वाढती लोकप्रियता पाहता सॅम कॉन्स्टासच्या पगारात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. इनसाइड स्पोर्टनुसार, श्रीलंकेविरुद्धच्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी कॉन्स्टासची निवड झाल्यास त्याला सुमारे 1.87 कोटी रुपयांचा बोनस मिळू शकतो.
दरम्यान, कारकिर्दीतील तिसरा कसोटी सामना खेळल्यानंतर कॉन्स्टास ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाकडून केंद्रीय करार मिळविण्यासाठी पात्र ठरेल. केंद्रीय करार मिळाल्यावर, कॉन्स्टासचे वार्षिक वेतन सुमारे 2.88 कोटी रुपये असेल.
बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या 2 सामन्यात कॉन्स्टासने 113 धावा केल्या. भारताविरुद्ध पदार्पण करण्यापूर्वी सॅम कॉन्स्टास बिग बॅश लीगमध्ये सिडनी थंडरकडून खेळत होता.
हंगामातील पहिल्याच सामन्यात त्याने केवळ 27 चेंडूत 56 धावांची तुफानी खेळी केली. या खेळीत त्याने 8 चौकार आणि 2 षटकार मारले. दरम्यान, बिग बॅश लीगच्या इतिहासात सिडनी थंडरसाठी सर्वात वेगवान अर्धशतक करणारा तो खेळाडूही ठरला.
त्याने ॲडलेड स्ट्रायकर्सविरुद्ध अवघ्या 20 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. कॉन्स्टासने पहिल्या सामन्यात 60 धावा केल्या, मात्र त्यानंतर 3 डावात तो काही खास करू शकला नाही.