OTT Release: नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा एंटरटेनमेंट फुल्ल ऑन; नवे चित्रपट अन् सीरिजची मेजवानी
नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा अत्यंत रोमांचक असणार आहे. या आठवड्यात अनेक बहुप्रतिक्षित चित्रपट आणि सीरिज ओटीटीचं दार ठोठावणार आहेत. या आठवड्यात Netflix, Prime Video, Disney + Hotstar, Zee5, JioCinema आणि इतर स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर कोणते चित्रपट आणि सीरिज प्रदर्शित होत आहेत, ते सविस्तर जाणून घेऊयात...
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसिकंदर का मुकद्दर : हा एक हिंदी चित्रपट एका दरोड्यावर आधारित आहे. एक पोलीस दरोड्याचा तपास करत असतो, त्यानंतर तो त्या प्रकरणातल्या मुख्य संशयिताचा पाठलाग करत असतो. या चित्रपटात अश्रुत जैन, तमन्ना भाटिया, जिमी शेरगिल, अविनाश तिवारी आणि दिव्या दत्त यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सिकंदर का मुकद्दर हा चित्रपट 29 नोव्हेंबरला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
तामिळ चित्रपट बल्डी बेगर एका भिकाऱ्याच्या आयुष्याभोवती फिरतो. या चित्रपटात काविन, अनारकली नजर, मरीन फिलिप, सलीमा आणि सुनील सुखदा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 29 नोव्हेंबर रोजी प्राईम व्हिडिओवर ब्लडी बेगर रिलीज होणार आहे.
'द मॅडनेस' ही अमेरिकन सीरिज आहे. शोमध्ये गॅब्रिएल ग्रॅहम, टॅमसिन टोपोल्स्की, मार्शा स्टेफनी ब्लेक, थॅडियस जे. मिक्सन आणि कोलमन डोमिंगो मुख्य भूमिकेत आहेत. द मॅडनेस 28 नोव्हेंबरला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
तमिळ वेब सिरीज पॅराशूट घरातून पळून जाणाऱ्या दोन मुलांभोवती फिरते. त्यांचे पालक त्यांना शोधण्यासाठी धडपडत आहेत. या शोमध्ये कृष्णा, किशोर, कानी, काली वेंकट, बावा चेल्लादुराई, शरण्य आणि शाम यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. पॅराशूट 29 नोव्हेंबर रोजी Disney+Hostar वर प्रदर्शित होईल.
डायवोर्स के लिए कुछ भी करेगा : ही एक कॉमेडी वेब सीरिज आहे, जी दोन पत्रकारांची कहाणी आहे. स्टिंग ऑपरेशन केल्यानंतर त्यांच्या जीवनात एक वळण येतं... शोमध्ये ऋषभ चड्ढा आणि अबीगॅल पांडे मुख्य भूमिकेत आहेत. ही वेब सीरिज 29 नोव्हेंबर रोजी Zee5 वर प्रदर्शित होणार आहे.
'द ट्रंक' शो ड्रामा शो मध्ये सीक्रेट मॅरेज सर्विसचा पर्दाफाश करताना दाखवण्यात आलं आहे. शोमध्ये गोंग यू, सेओ ह्यूनजिन आणि जंग युन्हा मुख्य भूमिकेत असणार आहेत. 'द ट्रंक' 29 नोव्हेंबरला नेटफ्लिक्सवर रिलीज केला जाणार आहे.
'वुमन ऑफ द आवर'ची कहाणी एका महत्त्वकांक्षी अभिनेत्रीच्या आसपास फिरते... ही अभिनेत्री 1970 च्या दशकात एका डेटिंग शोमध्ये प्रेमाच्या शोधात जाते. शोमध्ये एना केंड्रिक आणि डेनियल जोवाटो मुख्य भूमिकेत आहेत. वुमन ऑफ द आवर 29 नव्हेंबर रोजी लायंसगेट प्लेवर रिलीज होणार आहे.