Weekly Lucky Zodiacs : पुढचे 7 दिवस 'या' 5 राशींसाठी ठरणार भाग्यवान; नोकरी-व्यवसायात मिळणार भरघोस यश, होणार चिक्कार धनवाढ
Weekly Lucky Zodiacs : नोव्हेंबर महिन्यातला नवीन आणि शेवटचा आठवडा आजपासून सुरु झाला आहे. हा आठवडा काही राशींसाठी फार शुभकारक असणार आहे.

Weekly Lucky Zodiacs
1/8
नोव्हेंबर महिन्यातला शेवटचा आठवडा आजपासून सुरु झाला आहे. हा आठवडा काही राशीच्या लोकांसाठी भाग्यवान ठरणार आहे.
2/8
या आठवड्यात कोणत्या राशींचे भाग्य उजळू शकते ते जाणून घेऊयात.
3/8
वृषभ राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा शुभ असणार आहे.या आठवड्यात तुम्हाला तुमच्या बिझनेसशी संबंधित शुभवार्ता ऐकायला मिळू शकते. तसेच, तुमच्या सुख-सुविधांमध्ये चांगली वाढ झालेली दिसेल.
4/8
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजपासून सुरु झालेला नवीन आठवडा फार शुभ असणार आहे. या काळात तुम्ही हाती घेतलेलं काम पूर्ण होईल. तसेच, तुमचा बॉस तुमच्या कामावर प्रसन्न असेल. तुमच्यावर एखादी जबाबदारी सोपवली जाऊ शकते. या कालावधीत प्रवासाचे चांगले योग आहेत.
5/8
सिंह राशीच्या लोकांसाठी नवीन आठवड्यात तुमच्या नशिबाचे दार खुलू शकतात. ऑफिसमध्ये अनेक लोक तुमच्या कामाचं कौतुक करतील. तसेच, तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर देखील मिळू शकते. तुमच्या पार्टनरबरोबर तुमची लव्ह लाईफ चांगली असेल.
6/8
कन्या राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा शुभकारक असणार आहे. या आठवड्यात एखाद्या प्रभावी व्यक्तीच्या मदतीने तुमची सगळी कामे पूर्ण होतील. तुमचे रखडलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. तुमचं बॅंक बॅलेन्स वाढण्याची शक्यता आहे.
7/8
धनु राशीच्या लोकांसाठी आजपासून सुरु झालेला नवीन आठवडा चांगला असणार आहे. विद्यार्थ्यांना या काळात चांगला लाभ मिळेल. फक्त घाईगडबडीत कोणताही निर्णय घेऊ नका. अन्यथा तुम्हाला पश्चात्ताप होईल.
8/8
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Published at : 25 Nov 2024 10:36 AM (IST)