'लापता लेडीज' ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर, पण UK चा हिंदी चित्रपट 'संतोष' शॉर्टलिस्ट; काय आहे कथा?
Oscar 2025: लापता लेडीज ऑस्कर 2025 च्या शर्यतीतून बाहेर पडली आहे, पण या यादीत ब्रिटनचा हिंदी चित्रपट 'संतोष'नं स्थान मिळवलं आहे. जाणून घेऊयात, काय आहे संतोषची कहाणी?
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसंतोष हा ब्रिटननं बनवलेला हिंदी भाषेतील चित्रपट आहे. या चित्रपटाला ऑस्कर 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर चित्रपट कॅटेगरीत स्थान मिळालं आहे.
संतोष हा ब्रिटीश भारतीय चित्रपट निर्मात्या संध्या सुरी यांनी बनवला आहे. हा चित्रपट यूके, भारत, जर्मनी आणि फ्रान्स यांच्यात इंटरनेशल को-प्रोडक्शन आहे.
संतोषचा मे 2024 मध्ये 77व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये वर्ल्ड प्रीमियर झाला होता, जिथे या चित्रपटाला खूपच दादा मिळाली आणि सकारात्मक प्रतिसादही मिळाला होता.
संध्या सुरी दिग्दर्शित, या चित्रपटाची पटकथा एका तरुण हिंदू विधवेभोवती फिरते, या विधवेची भूमिका शहाना गोस्वामीनं साकारली आहे, जिला तिच्या पतीच्या मृत्यूनंतर त्याच्या जागी पोलीस हवालदार म्हणून नोकरी मिळाली आहे.
पण, नोकरी करताना तिला संस्थात्मक भ्रष्टाचाराशी झुंजावं लागत असल्यानं तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. एका दलित मुलीच्या निर्घृण हत्येचा तपास करण्याची जबाबदारी ती कशी पार पाडते? हे चित्रपट पाहिल्यानंतरच कळेल.
संतोष फिल्म फेस्टिवलमध्ये प्रीमियर करण्यात आला. हा चित्रपट अद्याप OTT वर प्रदर्शित झालेला नाही.
संतोष अभिनेत्री शहाना गोस्वामीनं तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर अकादमीच्या शॉर्टलिस्टची झलक शेअर केली आहे. तिनं लिहिलं आहे की, आमच्या संतोष चित्रपटाला मिळालेल्या या लहानशा सन्मानासाठी मी टीमसाठी, विशेषत: आमच्या लेखिका-दिग्दर्शिका संध्या सुरी यांच्यासाठी खूप आनंदी आहे. 85 चित्रपटांमधून शॉर्टलिस्ट होणं किती अविश्वसनीय आहे. ज्यांना ते आवडलं, समर्थन दिलं आणि मतदान केलं त्या प्रत्येकाचे आभार.