एकही चित्रपट नाही, तरीही आहे बॉलीवूडचे एक मोठे नाव, जाणून घ्या रणबीर कपूरच्या बहिणीबद्दलच्या खास गोष्टी!

ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांची मुलगी रिद्धिमा कपूर, जिने तिची आई, वडील आणि भावाप्रमाणे चित्रपटात प्रवेश केला नाही.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
पण आता ती पहिल्यांदाच टीव्ही मालिका 'फॅब्युलस लाईव्हज ऑफ बॉलीवूड वाइव्हज'चा भाग बनली आहे.

रिद्धिमा कपूरचा नवरा दिल्लीतील बिझनेसमन असून त्याचे नाव भरत साहनी आहे.
रिद्धिमाही तिथे काम करते. त्यांचा ज्वेलरी डिझाईनचा व्यवसायही आहे. ती अनेकदा तिच्या कामाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
रिद्धिमा कपूर आणि भरत साहनी यांचे २००६ साली लग्न झाले. दोघेही कॉलेजपासूनचे मित्र. असे म्हटले जाते की दोघेही जवळपास 5 वर्षे रिलेशनशिपमध्ये होते आणि त्यानंतर दोघांनी लग्न केले.
आता दोघांनाही समायरा नावाची एक लाडकी मुलगी आहे, जिला मामा रणबीर कपूर आणि मावशी आलिया भट्ट सारखे काम करायचे आहे.
रिद्धिमा कपूरचा नवरा भरत हा एक यशस्वी बिझनेसमन आहे. त्यांचा गारमेंट एक्सपोर्टचा व्यवसाय आहे. त्यांच्या कंपनीचे नाव WearWell आहे.
GQ च्या अहवालानुसार, भरत साहनीच्या कंपनीची वार्षिक उलाढाल 30 दशलक्ष डॉलर्स म्हणजे सुमारे 250 कोटी रुपये आहे. भरत 2002 मध्ये या कंपनीत रुजू झाला.
भरत आणि रिद्धिमाचे घर दक्षिण दिल्लीत आहे. दोघांचे एक भव्य घर आहे ज्यामध्ये जिमपासून ते आलिशान घर आणि बाग असे सर्व काही आहे. इंस्टाग्रामवर त्यांच्या घराची छायाचित्रे पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.