एक्स्प्लोर
PHOTO : प्रियांका चोप्रा गोल्फच्या मैदानात, सिझलिंग फोटोंवर निक जोनासाची खास कमेंट!

Priyanka Chopra, Nick Jonas
1/6

प्रियांका चोप्राने गोल्फ खेळतानाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये प्रियांका चोप्रा पांढऱ्या आणि राखाडी रंगाच्या क्रॉप टॉप आणि फिट स्कर्टमध्ये दिसत आहे.
2/6

अभिनेत्रीसोबत तिचा पती निक जोनासही (Nick Jonas) मित्रांसोबत गोल्फ खेळण्यासाठी आला होता. या दोघांचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
3/6

प्रियांका चोप्राने गोल्फ मैदानातील फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती काळ्या सनग्लासेस घालून केस बांधताना दिसत आहे. प्रियांकाचे हे फोटो पाहून पती निक जोनासही घायाळ झाला आहे.
4/6

या फोटोंवर कमेंट करताना निक जोनासने लिहिले की, ‘तू इतकी हॉट का आहेस?’ फोटो शेअर करताना प्रियांकाने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘आजचा दिवस चांगला होता.’
5/6

मुलीच्या जन्मानंतर प्रियांकाने काही काळ सोशल मीडियावरून ब्रेक घेतला होता. मात्र, आता ती पुन्हा एकदा चाहत्यांचे मनोरंजन करायला आणि आपल्या अपडेट्स द्यायला सोशल मीडियावर सक्रिय झाली आहे.
6/6

सध्या प्रियांका आणि निक जोनास दोघेही सोशल मीडियावर भरपूर पोस्ट करत आहेत. (Photo : Priyanka Chopra/IG)
Published at : 02 May 2022 07:45 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
बॉलीवूड
विश्व
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
