Netflix Top 10: क्राईम थ्रिलरपासून कॉमेडीपर्यंत... नेटफ्लिक्सवर ट्रेंड करतायत 'या' 10 फिल्म्स
नेटफ्लिक्सवर दमदार क्राईम, थ्रिलर आणि कॉमेडी मूव्ही अवेलेबल आहेत. आम्ही तुम्हाला या आठवड्याच्या टॉप ट्रेडिंग 10 फिल्म्सची नावं सांगणार आहोत. लिस्टमध्ये कॉमेडी चित्रपटांपासून अॅक्शन फिल्म्सच्या नावांचा समावेश आहे. पाहा संपूर्ण यादी...
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदो पत्ती (Do Patti) : काजोल, कृती सेनन मुख्य भूमिकेत असलेली ही फिल्म दो पत्ती ला आयएमडीबी रेटिंग 6.5 आहे. ही एक मिस्ट्री थ्रिलर फिल्म आहे. यामध्ये कृती सेनन डबल रोलमध्ये दिसून आली आहे.
दॅट ख्रिसमस (That Christmas) : दॅट ख्रिसमस ब्रिटिश अॅनिमेटेड ख्रिसमस फॅमिली कॉमेडी फिल्म आहे.याचं आयएमडीबी रेटिंग 6.8 आहे.
देवरा (Devra) : सैफ अली खानचा देवरा लिस्टमध्ये आठव्या क्रमांकावर आहे. याचं IMDb रेटिंग 6.1 आहे. ही एक अॅक्शन फिल्म आहे.
सिकंदर का मुकद्दर (Sikandar Ka Muqaddar) : सिकंदर का मुकद्दर एक थ्रिलर फिल्म आहे. फिल्मला नीरज पांडे यांनी दिग्दर्शिक केलं आहे. याची IMDb रेटिंग 6.1 आहे.
थंगालान (Thangalaan) : थंगालान एक तमिळ अॅक्शन अॅडव्हेंचर फिल्म आहे. यादीत ही फिल्म सहाव्या क्रमांकावर आहे. याचं IMDb रेटिंग 6.9 आहे.
कॅरी-ऑन (Carry-On) : कॅरी-ऑन एक अमेरिकी अॅक्शन थ्रिलर फिल्म आहे, जी जॅम कोलेट-सेरा यांनी डायरेक्ट केली आहे. या फिल्मची IMDb रेटिंग 6.6 आहे.
जिगरा (Jigra): नेटफ्लिक्सवरच्या टॉप 10 चित्रपटांपैकी एक जिगरा. या चित्रपटात आलिया भट्टचा दमदार अभिनय पाहायला मिळतो. फिल्मचं IMDb रेटिंग 6.3 आहे.
अमरन (Amaran) : अमरन हा राजकुमार पेरियासामी दिग्दर्शित बायोपिक आहे. चित्रपटाचं IMDb रेटिंग 8.4 आहे.
लकी भास्कर (Lucky Bhaskar): 2024 मध्ये रिलीज करण्यात आलेला लकी भास्कर एक क्राईम, थ्रिलर चित्रपट आहे. यामध्ये दुलकर सलमान मुख्य भूमिकेत दिसून आला आहे. हा एक तेलगू चित्रपट आहे, जो नेटफ्लिक्सवर हिंदी भाषेत उपलब्ध आहे. याची आयएमबीडी रेटिंग 8.1 आहे.