Vastu Tips : घरात हत्तीची मूर्ती नेमकी कोणत्या दिशेला असावी? जाणून घ्या वास्तूशास्त्रात काय म्हटलंय...
Vastu Tips : वास्तूशास्त्रात प्रत्येक गोष्टीसाठी वेगवेगळे नियम आणि उपाय सांगितले जातात. त्याचप्रमाणे घरात हत्ती नेमका कोणत्या दिशेला असावा या संदर्भात देखील विविध नियम सांगण्यात आले आहेत.
Vastu Tips
1/8
खरंतर, हत्ती हा सकारात्मकता, समृद्धी आणि आनंदाचं प्रतीक मानला जातो. तसेच, हत्ती हे देवी लक्ष्मीचं देखील वाहन आहे. त्यामुळे हत्तीची मूर्ती नेमकी कोणत्या दिशेला असावी हे जाणून घेऊयात.
2/8
वास्तूशास्त्रानुसार, चांदीची हत्तीची मूर्ती घराच्या उत्तर दिशेला ठेवणं शुभ मानलं जाते. त्यामुळे घरात सुख-समृद्धी वाढते. तसेच, सकारात्मक ऊर्जा राहते.
3/8
घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ हत्तीची मूर्ती ठेवल्यास घरात सकारात्मकता येते.
4/8
तसेच, घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ तुम्ही दोन हत्तीच्या जोड्याही ठेवू शकता.
5/8
ऑफिसच्या ठिकाणी तुम्ही कुठेही हत्तीची मूर्ती ठेवू शकता. हत्ती हा एक संरक्षक आहे.
6/8
मुलांच्या खोलीतसुद्धा तुम्ही हत्तीची मूर्ती खेळणी, वॉलपेपप किंवा स्टडी टेबल म्हणून ठेवता येऊ शकतो.
7/8
घराच्या बेडरुममध्ये देखील तुम्ही हत्तीची मूर्ती ठेवू शकता. यामुळे वैवाहिक जीवनातील नातं घट्ट राहतं.
8/8
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Published at : 28 Nov 2024 03:22 PM (IST)