Fetisch Barbie : 'बार्बी डॉल'सारखं दिसण्यासाठी महिलेनं खर्च केले कोट्यवधी रुपये; बोटॉक्सचा अतिरेक, फुगलेले ओठ पाहुन नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
ऑस्ट्रेलियातील 30 वर्षीय मॉडेल सोशल मीडियावर 'फेटिश बार्बी' म्हणून ओळखली जाते. तिने बॉर्बीप्रमाणे दिसण्यासाठी बोटॉक्स आणि फिलर्स ट्रिटमेंटवर कोट्यवधी खर्च केले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबोटॉक्स आणि फिलर्स करुन या मॉडेलने तिच्या ओठांचा आकार फार वाढवला आहे, ते दिसायलाही फार विचित्र दिसत आहे.
याशिवाय तिने ब्रेस्ट इंप्लांटही केले आहे. लीप फिलर्स आणि ब्रेस्ट इंप्लांट यामुळे तिच्या शरीराचा आकार विचित्र दिसत आहे.
'फेटिश बार्बी' म्हणून प्रसिद्ध असलेली मॉडेल एक सोशल मीडिया पर्सनॅलिटी आहे. ती बोल्ड फोटोशूट आणि व्हिडीओ शेअर करत कायम चर्चेत राहते.
बोटॉक्स आणि फिलर्स करुन ती तिचा चेहरा खराब करेल, असं तिच्या मित्रांना वाटतं. पण, तिला त्याची पर्वा नाही कारण, तिला तिचं फुगलेलं रूप आवडतं.
मोठे केस, मोठे ओठ, लांब नखे हे तिच्यासाठी खूप महत्त्वाची आहेत.
ती दर 3 ते 4 महिन्यांनी लिप फिलर्स करून घेते, ज्यामुळे तिचे ओठ अधिक मोठे दिसतात.
आतापर्यंत बोटॉक्स ट्रिटमेंटवर तिने 32 लाख ते 53 लाख रुपये खर्च केले आहेत. तिला बोटॉक्सचे व्यसन आहे, असंही ती सांगते. वयाच्या 18 व्या वर्षापासून ती लिप फिलर वापरते.
एकीकडे तिचे मित्र तिच्यासाठी चिंतेत आहेत, तर दुसरीकडे सोशल मीडियावर तिला गंभीर टीकेला सामोरं जावं लागत आहे.
इतकंच नाही तर ती कुठेतरी बाहेर गेली तरी लोक तिच्याकडे टक लावून बघतात. लहान मुलं तिला पाहून घाबरतात.
असं असलं तरी, सोशल मीडियावर ती खूप चर्चेत असते.
ती टीकेचा सामना करत आपल्याला हवं तसं आयुष्य जगण्यातच मूळ समाधान मानते.