PHOTO: मांजरीबरोबर पोज देत रिंकू राजगुरूने शेअर केलं न्यू इयर फोटोशूट; पाहा फोटो!
अभिनेत्री रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App'सैराट' (Sairat) या सिनेमाच्या माध्यमातून अभिनेत्री घराघरांत पोहोचली आहे. पहिल्या सिनेमाने अभिनेत्री ब्रेक मिळाला.
या सिनेमात तिने साकारलेली आर्चीची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली
‘सैराट’ या सिनेमाच्या माध्यमातून रिंकू राजगुरूने मनोरंजन विश्वात पदार्पण केले. या सिनेमाने अवघ्या चित्रपटसृष्टीत कल्ला केला होता. या सिनेमामुळे रिंकूला जगभरात ‘आर्ची’ म्हणून प्रसिद्धी मिळाली होती.
पहिल्याच चित्रपटातून रिंकू चाहत्यांची लाडकी अभिनेत्री बनली होती. ‘सैराट’नंतर रिंकूने ‘मेकअप’, ‘कागर’ अशा मराठी चित्रपटांमध्ये काम केलं. याशिवाय ती नुकतीच ‘झुंड’ या चित्रपटात झळकली होती.
‘झुंड’ या चित्रपटात महानायक अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत झळकले होते. रिंकूसोबतच या चित्रपटात ‘सैराट’ चित्रपटातील ‘परशा’ म्हणजेच अभिनेता आकाश ठोसर देखील झळकला होता.
मराठी अभिनेत्री रिंकू राजगुरूने (Rinku Rajguru) नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी फोटोशूटमधील काही फोटो शेअर केले आहेत.
रिंकूने समुद्रकिनारी कॅज्युअल लूकमध्ये फोटोशूट केले आहे.
या फोटोशूटसाठी रिंकूने पांढऱ्या रंगाचे शर्ट आणि काळी पॅण्ट परिधान केली आहे.