Prashant Damle : यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार अभिनेते प्रशांत दामले यांना जाहीर झाला आहे.

मराठी रंगभूमीवरील मानाचा समजला जाणारा नाट्य क्षेत्रातील विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार (Vishnudas Bhave Gaurav Padak Award) जाहीर झाला आहे.(image source: Prashant Damle Facebook)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
अभिनेते प्रशांत दामले (Prashant Damle) यांना यंदाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. यंदा दिले जाणारे हे 56 वे गौरव पदक आहे. (image source: Prashant Damle Facebook)

अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समिती, सांगली ही संस्था गेली 80 वर्ष नाट्यक्षेत्रात कार्य करीत आहे. संस्थेतर्फे 5 नोव्हेंबर रंगभूमीदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. (image source: Prashant Damle Facebook)
प्रशाांत दामले हे अखिल भारतीय नाट्य परिषद मध्यवर्ती शाखेचे अध्यक्ष असण्यासोबत लोकप्रिय अभिनेते आहेत.(image source: Prashant Damle Facebook)
प्रवासात प्रशांत दामले यांना अनेक प्रतिष्ठीत पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. त्यांच्या नावावर पाच लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स आहेत. (image source: Prashant Damle Facebook)
प्रशाांत दामले यांनी नाटकाशिवाय 37 मराठी चित्रपट आणि 24 दूरदर्शन मालिकांमध्ये काम केले आहे. यात 'आम्ही सारे खवय्ये' या लोकप्रिय मालिकेचाही समावेश आहे.(image source: Prashant Damle Facebook)
दामले यांना 20 पेक्षा अधिक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्र राज्य पुरस्कार, नाट्यदर्पण पुरस्कार, कलारंजन पुरस्कार, दीनानाथ मंगेशकर पुरस्कार आणि अखिल भारतीय नाट्य परिषदेचे विविध पुरस्कार यांचा समावेश आहे.(image source: Prashant Damle Facebook)
प्रशांत दामले यांनी फेब्रुवारी 1983 पासून आजपर्यंत 12500 पेक्षा अधिक नाटकांचे प्रयोग त्यांनी केले आहेत.(image source: Prashant Damle Facebook)
टूर टूर, पाहुणा, चाल काहीतरीच काय, गेला माधव कुणीकडे, बे दुणे चार, शूः कुठे बोलायचे नाही, एका लग्नाची गोष्ट, एका लग्नाची पुढची गोष्ट, जादू तेरी नजर, कार्टी काळजात घुसली, साखर खाल्लेला माणूस, सारख काहीतरी होतय, लेकुरे उदंड झाली ही गाजलेली नाटकं प्रशांत दामले यांची आहेत.(image source: Prashant Damle Facebook)
प्रशांत दामले मराठी रंगभूमीवरील चतुरस्त्र अभिनेते आहेत.(image source: Prashant Damle Facebook)