Nanded Ratneshwari : गडावर वसलेली माता रत्नेश्वरी, हजारो भाविकांचे श्रद्धास्थान; नवरात्रोत्सवात दर्शनासाठी गर्दी
दरवर्षी नवरात्र उत्सव काळात या ठिकाणी भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलोहा तालुक्यातील वडेपुरी येथील गडावर यादवांच्या कालखंडात श्री रत्नेश्वरी देवी मातेच्या मंदिराची उभारणी झाली.
मंदिराच्या उभारणीनंतर हा गड 'रत्नेश्वरी गड' या नावाने ओळखला जाऊ लागला.
हेमाडपंथी बांधकाम, अनेक अख्यायिकांचे दिले जाणारे दाखले आणि भाविकांची श्रद्धा यामुळे रत्नेश्वरी देवी मंदिराचे वेगळेपण अधोरेखित होते.
या मंदिराबाबतची अख्यायिका सांगितली जाते की, नारायण माळी आणि लक्ष्मीबाई यांची रत्नाही तेजस्वी कन्या. लहानपणापासून तिने समाजकल्याण केलं.
यादवांचा किल्ला बांधणाऱ्या कारागिरांकडून रत्नाने महादेवाची पिंड तयार करुन घेतली. श्रावण महिन्यात दररोज पूजेसाठी येथे येण्याचा संकल्प तिने केला.
यादवांचा सरदार शंभुनाथ माळी यांच्यासोबत रत्नाचा विवाह झाला. विवाहानंतर भल्या पहाटे रत्ना महादेवाच्या पूजेसाठी येत असताना शंभुनाथ यांनी तिचा पाठलाग केला
याच ठिकाणी रत्नाचे शिळेत रुपांतर झाले. पुढे याच ठिकाणी रत्नादेवीचे मंदिर उभारण्यात आले. अशी अख्यायिका सांगितली जाते.
रत्नेश्वरी देवी मंदिर परिसरातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे.
image 10
भाविक या ठिकाणी येऊन आपली मनोकामना व्यक्त करतात. त्यानंतर त्याची पूर्तता होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
यामुळे दूरहून अनेक भाविक येथे दर्शनासाठी येतात.
नवरात्र काळात येथे भाविकांची दर्शनासाठी रिघ लागते.