Mammootty Birthday: साऊथ सुपरस्टार 'ममुटी', 100 कोटींच्या अलिशान कार; अभिनेत्याची एकूण संपत्ती किती
7 सप्टेंबर हा साऊथ सुपरस्टार ममुटी यांचा जन्मदिवस. मल्याळम सिनेमाचे सुपरस्टार म्हणून ममुटी यांची सिने इंडस्ट्रीला ओळख आहे. विशेष म्हणजे मल्याळम चित्रपट सृष्टीचे ते सर्वात श्रीमंत अभिनेतेही आहेत
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appममुटी हे आज 73 वर्षांचे सिनेअभिनेते बनले आहेत, कार शौकीन आणि डाऊन टू अर्थ असं व्यक्तीमत्व म्हणून ममुटींना ओळखलं जातं.
ममुटी यांचा जन्म 7 सप्टेंबर 1951 रोजी केरळ राज्यातील अलापुझ्झा जिल्ह्यातील चंदिरुर येथे झाला. त्यांचे खरं नाव मुहम्मद कुट्टी असं आहे. ते प्रामुख्याने मल्याळम चित्रपटात काम करतात
'विलक्कांउन्दु स्वप्नंगल' या चित्रपटातून त्यांनी आपलं फिल्मी करिअर सुरू केलं. सन 1980 मध्ये हा चित्रपट रिलीज झाला होता. त्यामुळे, सिनेसृष्टीत ममुटी यांना 43 वर्षांहन अधिक काळ झाला आहे.
आपल्या 43 वर्षांच्या चित्रपट करिअरमध्ये त्यांनी 400 चित्रपटांत अभिनय केला आहे. त्यात, तीनवेळा त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय.
एका वर्षात 35 चित्रपट करण्याचा विक्रमही ममुटी यांच्या नावावर आहे. तर, कारशौकिन आणि लग्झऱी लाईफस्टाईमुळेही ते चर्चेत असतात. त्यांच्याकडे अलिशान कारचा ताफा आहे.
कोच्ची येथे आपल्या कुटुंबासमवेत ते राहतात, त्यांच्याकडे 369 कार असून त्यात अलिशान, लग्झरी कार्सचा समावेश आहे. त्यांची एकूण संपत्ती 340 कोटी रुपये असून त्यांच्याकडील कार्संची किंमत 100 कोटी एवढी आहे.