एका सामन्यात कॉमेंट्री करण्यासाठी किती रुपये मिळतात?; आकाश चोप्राने सांगितला चक्रावणारा आकडा
क्रिकेटमध्ये समालोचकाची भूमिका फार महत्वाची असते. भारतात अनेक माजी खेळाडू समालोचक (कॉमेंटेटर) ची भूमिका बजावतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरवी शास्त्री, सुनील गावसकर, हरभजन सिंग, आकाशा चोप्रा, आरपी सिंह, सुरेश रैना, इरफान पठाण, प्रग्यान ओझा, विरेंद्र सेहवाग, आशिष नेहरा, झहीर खान असे अनेक खेळाडू कॉमेंट्री करतात.
आंतरराष्ट्रीय सामन्यांपासून आयपीएलपर्यंत हे कॉमेंटेटर आपल्याला दिसून येतात.
कॉमेंट्री करण्यासाठी एका सामन्याला किती रुपये घेतात, हे तुम्हाला माहितीय का?
कॉमेंटेटर आकाश चोप्राने याबाबत खुलासा केला आहे. एका मुलाखतीत आकाश चोप्राला कॉमेंटेटरच्या कमाईबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावेळी त्याने कॉमेंटेटरच्या कमाईवर प्रतिक्रिया दिली.
कॉमेंटेटर एका सामन्यासाठी फी मिळते, ज्यामध्ये तो दररोज 6 ते 10 लाख रुपये कमवू शकतो.
एखाद्या समालोचकाने वर्षातून 100 दिवस कॉमेंट्री केली तर त्याला वर्षभरात 10 कोटी रुपये मिळतील, असं आकाश चोप्राने सांगितले.