In Pics : Mandira Bedi आणि Raj Kaushal यांचा मुंबईतील आलिशान व्हिला आता भाड्याने उपलब्ध!
अभिनेत्री मंदिरा बेदी सध्या आयुष्यातील अशा दु:खातून जात आहे, ज्याची भरपाई होऊ शकणार नाही. पती राज कौशल यांचं दोन दिवसांपूर्वीच निधन झालं. परंतु त्यांच्या मृत्युआधी मंदिरा आणि राज यांनी संपत्तीबाबत मोठा निर्णय घेतला होता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअभिनेत्री, फिटनेस आयकॉन आणि बिझनेसवुमन मंदिरा बेदीने काही महिन्यांपूर्वी मुंबईतील मड आयलंड इथलं आलिशान घर भाड्याने देण्याचा निर्णय घेतला होता. आता हा बंगला एअरपीएनबीद्वारे सामान्यांसाठी खुलं करण्यात आलं आहे.
मंदिरा आणि तिच्या आईने सुमारे 15 वर्षांपूर्वी त्यांनी या घरात गुंतवणूक केली होती. तिने हे घर शूटिंग बंगला बनवला होता. म्हणजे विविध कला दिग्दर्शक हा बंगला मॉडिफाय करु शकत होते.
चार बेडरुम असलेला हा सुंदर व्हिला आहे, ज्यात उत्तम फर्निचर आहे.
हा व्हिला आता भाड्याने देणार असल्याचं वृत्त आहे.
समुद्रकिनारी असलेल्या या व्हिलातील सर्वात सुंदर जागा म्हणजे यामधील स्विमिंग पूल. इथून समुद्राचा नजाराही पाहता येतो.