PHOTO : मधुबाला ते प्रियांका चोप्रापर्यंत अनेक अभिनेत्रींना आवाज देणाऱ्या लता मंगेशकर यांचा आज दुसरा स्मृतीदिन!
लता मंगेशकर यांनी त्यांच्या कारकिर्दीत मधुबालापासून ते प्रियंका चोप्रापर्यंत अनेक अभिनेत्रींसाठी गाणी गायली आहेत. (pc:lata_mangeshkar/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appत्यांनी अनेक बॉलिवूड अभिनेत्रींना आपला आवाज दिला आहे. त्यातून लता मंगेशकर यांचे भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदान लक्षात येते. (pc:lata_mangeshkar/ig)
लतादीदी या भारतीय चित्रपटसृष्टीतील महत्त्वाच्या साक्षीदार होत्या. चित्रपटसृष्टीत आलेली स्थित्यंतरे त्यांनी पाहिली. (pc:lata_mangeshkar/ig)
गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचा आज दुसरा स्मृतीदिन आहे.(pc:lata_mangeshkar/ig)
लतादीदी यांनी गायलेली हजारो गाणी आजही संगीतप्रेमींच्या मनात घर करून आहेत. लतादीदी यांनी आपल्या कारकीर्दीत 36 भाषांमध्ये सुमारे 50 हजारांहून अधिक गाणी गायली आहेत.(pc:lata_mangeshkar/ig)
गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचा जन्म 28 सप्टेंबर 1929 रोजी इंदूरमध्ये झाला. (pc:lata_mangeshkar/ig)
लतादीदींना पहिले संगीताचे धडे वडील मास्टर दीनानाथ मंगेशकरांकडून मिळाले. (pc:lata_mangeshkar/ig)
वयाच्या पाचव्या वर्षी त्यांनी वडिलांच्या संगीत नाटकांमध्ये बाल-कलाकार म्हणून कामाची सुरुवात केली.(pc:lata_mangeshkar/ig)
संगीत क्षेत्रातील अलौकिक स्वरांनी त्यांनी जगाला मोहिनी घातली. त्यांच्या आवाजाने अनेक गाणी अजरामर झाली (pc:lata_mangeshkar/ig)
मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या अकस्मात निधनानंतर वयाच्या तेराव्या वर्षी लतादीदींनी संगीतक्षेत्रात काम करायला सुरुवात केली. (pc:lata_mangeshkar/ig)
लतादीदी यांनी सुरुवातीच्या काळात अभिनेत्री म्हणून काही चित्रपटात छोट्या भूमिका साकारल्या. (pc:lata_mangeshkar/ig)
त्याच दरम्यान त्यांनी शास्त्रीय संगीताचे धडे गिरवण्यास सुरुवात केली होती.(pc:lata_mangeshkar/ig)