Ayodhya : काल मुंबईहून अयोध्येला पहिली 'अयोध्या आस्था रेल' रवाना!
मुंबई ते अयोध्या ही ट्रेन काल रात्री 9 वाजता मुंबईतून रवाना झाली.छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ही रेल्वे रवाना झाली. (Photo credit : Telegram/Devendra fadnavis)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील, मंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार, खासदार गोपाळ शेट्टी यांनी रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला. (Photo credit : Telegram/Devendra fadnavis)
शेकडो राम भक्तांना प्रभू श्रीरामाच्या दर्शनाला घेऊन जाणाऱ्या मुंबई ते अयोध्या ही ट्रेन रवाना झाली. (Photo credit : Telegram/Devendra fadnavis)
मुंबई ते अयोध्या या पहिल्या 'अयोध्या आस्था रेल'ला हजारो रामभक्तांच्या उत्साहात आणि जल्लोषात शुभारंभ केला. (Photo credit : Telegram/Devendra fadnavis)
यावेळी जय श्री रामच्या घोषणांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचे वातावरण राममय झाले होते. (Photo credit : Telegram/Devendra fadnavis)
याप्रसंगी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, मंत्री मंगलप्रभात लोढा उपस्थित होते. (Photo credit : Telegram/Devendra fadnavis)
अयोध्येत उभारलेल्या भव्य राम मंदिरात रामललाचे दर्शन घेण्यासाठी जगभरातील रामभक्त आतुर आहेत. (Photo credit : Telegram/Devendra fadnavis)
छत्रपती शिवाजी महाराजांची पावनभूमी असलेल्या महाराष्ट्रातून अयोध्येपर्यंत 'आस्था स्पेशल ट्रेन' सुरू झाल्याने राम भक्तांनी स्वागत केले. (Photo credit : Telegram/Devendra fadnavis)
मुंबईतून या पहिल्या ट्रेनने अयोध्येला जाणारे रामभक्त अत्यंत भाग्यशाली आहेत, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. (Photo credit : Telegram/Devendra fadnavis)
रामलला हम आयेंगे मंदिर भव्य बनायेंगे' ही घोषणा व स्वप्न सत्यात उतरविल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मनःपूर्वक आभार असे मंत्री मंगलप्रभात लोढा या वेळी म्हणाले. (Photo credit : Telegram/Devendra fadnavis)