Lakme Fashion Week 2021 | लॅक्मे फॅशन वीकमध्ये 'मोहेंजोदारो'फेम अभिनेत्री Pooja Hegde चा ग्लॅमरस अंदाज

लॅक्मे फॅशन वीक (Lakme Fashion Week 2021) म्हटलं की बॉलिवूड कलाकारांच्या रॅम्प वॉकची चर्चा होतेच. फॅशन जगतातील महत्त्वाचा मानल्या जाणाऱ्या फॅशन वीकमध्ये या वर्षी अभिनेत्री पूजा हेगडे (Pooja Hegde) सहभागी झाली होती.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
'मोहेंजोदारो'फेम अभिनेत्री पूजा हेगडेने आत्मविश्वासानं रॅम्प वॉक करत प्रचंड दाद मिळवली.

पूजाने वरुण चक्कीलाम लैबलने डिझाईन केलेला लेहंगा घातला होता. यामध्ये पूजा अतिशय सुंदर दिसत आहे.
पूजाने हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 2012 साली पूजाने तामिळ चित्रपटातून मनोरंजन विश्वात पदार्पण केलं
2016 साली आशुतोष गोवारीकर यांनी दिग्दर्शित केलेल्या 'मोहेंजोदारो' चित्रपटात ती अभिनेता हृतिक रोशनसोबत बॉलिवूडमध्ये झळकली.
पूजा तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाजामुळे कायम चर्चेत असते.
पूजा लवकरच 'राधे श्याम' या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात ती दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभाससोबत स्क्रीन शेअर करणार आहे.
अलिकडेच या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित झालं असून यात प्रभास आणि पूजा रोमॅण्टिक अंदाजात दिसून आले आहेत. ( सौजन्य : सर्व फोटो पूजा हेगडे इन्स्टाग्राम पेज)