Katrina Kaif In Pink : कटरिना कैफच्या गुलाबी अदा!
कटरिना कैफ चं हे इंडो वेस्टन लूक एक नवा प्रकार आहे. एका गुलाबी रंगाच्या स्कर्टसोबत तिने काळ्या रंगाचं फ्लॉरल ब्लाऊज घातलं. होळीच्या दिवशीचं हे कटरिनाचं आऊटफिट होतं, रंगांची उधळण करत तिने एक पोटोशूट केलं. रंगपंचमीच्या शुभेच्छा देत स्वत:ही रंगांसोबत ती खेळली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकटरिनाच्या अनेक फोटोंवरून तिचं फ्लॉरल प्रिंटसाठीचं प्रेम आपल्याला दिसतं. या गुलाबी आणि हिरव्या फ्लॉरल को-ऑर्ड सेटमध्ये कटरिना खुलून दिसतेय.
गुलाबी रंगाच्या या कोट स्टाईल ड्रेसमध्ये कटरिना एकदम हटके आणि स्टनिंग दिसत होती. न्यूड मेकअपसोबत मोकळे केस असा तिचा कॅज्युअल लूक होता. या आऊटफिटमध्ये कॅंडिड फोटो कटरिनाने इन्स्टाग्रामवर शेअर केलाय.
सेलिब्रिटी असो वा सामान्य कुणीही, सणासुदीला नटणं ही प्रत्येक स्त्रीसाठी आवडती गोष्ट आहे. दीपावलीच्या शुभेच्छा देत कटरिनाने एक फोटो शेअर केला. यावेळी दिवाळीचा सण असल्याने तिने गुलाबी शायनी साडी परिधान केली होती.
या बेबी पिंक प्रिंटेड शिफॉन साडीतील कटरिनाच्या सुंदर लूकवरून तुमची नजर हटणार नाही. साडीवर त्याच प्रिंटचा असलेला एक बेल्ट तिने कंबरेला लावला. या बेल्टने साडीच्या लूकला चार चॉंद लागले!