ट्रोल झाल्यानंतर Shahrukh Khan ला चाहत्यांचा मोठा पाठिंबा; फॅन्स होर्डिंग्जसह मन्नतसमोर

शाहरुख खान हा देशातील सर्वात मोठा सुपरस्टार आहे. पण सध्या हा सुपरस्टार खूप अस्वस्थ आहे. कारण आहे आर्यन खान. ड्रग्ज प्रकरणात आर्यन खान एनसीबीच्या ताब्यात आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
शाहरुख खानचं मोठं फॅन फॉलोइंग असले तरी या दोन दिवसात शाहरुख खानला सोशल मीडियावर बऱ्याच ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.

पण काही चाहते असेही आहेत जे या वाईट काळात शाहरुख खानसोबत उभे आहेत. आणि त्याला पूर्ण शक्तीने लढण्याचे धैर्य देत आहेत.
मंगळवारी असाच एक चाहता होर्डिंगसह मन्नतसमोर आला. शाहरुख खानला केवळ चाहत्यांकडूनच नाही तर बॉलिवूड सेलेब्सकडूनही समर्थन मिळत आहे.
आर्यन खानला दोन दिवसांपूर्वी क्रूझवर एका पार्टीदरम्यान एनसीबीने पकडले होते, त्याच्यासोबत इतर काही मोठे चेहरेही आहेत.
तेव्हापासून आर्यन खान एनसीबीच्या रिमांडवर आहे. आता त्याच्या कोठडीत 7 ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे.