Katrina Kaif Birthday : बॉलिवूडच्या ‘चिकनी चमेली'चा आज वाढदिवस
बॉलिवूड चित्रपटसृष्टीतील ब्युटीफुल गर्ल कॅटरिना कैफचा आज वाढदिवस आहे. कतरिना 38 वर्षांची झालीय.16 जुलै 1984 रोजी हाँगकाँगमध्ये कॅटरिनाचा जन्म झाला(photo courtesy : Katrina Kaif Instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबॉलिवूडमध्ये एक यशस्वी अभिनेत्री होण्याआधी कॅटरिनाने अनेक मॉडेलिंग शो केले. तसेच तिने तेलुगू आणि मल्याळम चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या होत्या. (photo courtesy : Katrina Kaif Instagram)
चित्रपटसृष्टीत कॅटरिनाला ‘कॅट’ या संबोधले जाते. कॅटरिनाचे वडील मोहम्मद कैफ हे काश्मिरी वंशाचे ब्रिटीश व्यावसायिक आहेत आणि आई सुझेन वकील आहे. कॅटरिनाला सहा बहिणी आणि एक भाऊ आहे.(photo courtesy : Katrina Kaif Instagram)
कॅटरिनाला हिंदी बोलता येत नव्हते. तिला अभिनयही नीट करता येत नव्हता.अशा सर्व गोष्टींवर मात करत कॅटरिनाने बॉलिवूडमध्ये स्वत:चे स्थान मिळवले. मॉडेलिंग ते बॉलिवूड असा कॅटरिनाचा प्रवास खरचं थक्क करणार आहे.(photo courtesy : Katrina Kaif Instagram)
करिअरच्या सुरूवातीला तिने काही मल्याळम चित्रपटात काम केले. 2003 साली दिग्दर्शक कैझाद गुस्ताद यांच्या ‘बूम’ सिनेमातून कॅटरीनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटात तिने महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम केले. तर 2004 साली कॅटरिना ‘मल्लीस्वरी’ या मल्याळम चित्रपटात झळकली .(photo courtesy : Katrina Kaif Instagram)
करिअरच्या दुसऱ्या वर्षी कॅटरिनाने सलमान खान बरोबर ‘मैंने प्यार क्यों किया’ चित्रपटात काम केले. त्यानंतरच या दोघांतील प्रेमसंबंधांच्या चर्चांना उधाण आलं. कतरिनाने त्या नंतर अनेक चित्रपटात काम केले. (photo courtesy : Katrina Kaif Instagram)
पार्टनर”, “रेस”, “सिंग इज किंग”, “वेलकम”, “जब तक है जान”, राजनीति, ज़िंदगी न मिलेगी दोबारा, मेरे ब्रदर की दुल्हन आणि एक था टायगर सारख्या हीट सिनेमांद्वारे कॅटरीनाने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली.(photo courtesy : Katrina Kaif Instagram)