ट्रेनिंग चार्टर विमान कोसळून एक जण ठार तर एक जण जखमी, पाहा फोटो

charter plane crash

1/5
ट्रेनिंग चार्टर विमान कोसळून एक जण ठार तर एक जण जखमी झाल्याची दुर्दैवी घटना जळगाव जिल्ह्यात चोपडा तालुक्यातील वर्डी गावा जवळ सातपुडा पर्वत रांगेत घडली आहे.
2/5
ही घटना काही वेळा पूर्वीच घडली असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली असून हे चार्टर विमान कुठे जात होते.
3/5
त्याचा अपघात कशामुळे झाला किंवा त्यातील व्यक्ती कोण याची अद्याप माहिती पोलिंसाना उपलब्ध झालेली नाही.
4/5
स्थानिक ग्रामस्थ या ठिकाणी मदतीला धावले असून यात चार्टर विमानमधील महिलेची सुटका करण्यात त्यांना यश मिळाले आहे. तरी पुरुषाचा मात्र मृत्यू झाला आहे.
5/5
ही घटना जंगल परिसरात घडली असल्याने या ठिकाणी पोहचण्यासाठी यंत्रणेला ही मोठे कष्ट पडत असल्याचे सांगण्यात येत आहे.घटनास्थळी अद्यापही मदत व बचाव कार्य सुरु आहे.
Sponsored Links by Taboola