Ganesh Chaturthi 2021: तैमुरसह अनेक कलाकारांच्या मुलांनी केली बाप्पाची पूजा, पाहा फोटो
राज्यभरात गणरायाचं आगमन झाले आहे. कोविडच्या सावटाखाली अनेक ठिकाणी साधेपणाने उत्सव साजरा होत असून लोकांचा उत्साह शिगेला पोहचलाय.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबॉलीवूड अभिनेत्री करीना कपूरच्या घरीही बाप्पाचं आगमन झालं आहे. तिने पती सैफ अली खान आणि मुलगा तैमुरसोबत बाप्पाची पूजा केली.
शिल्पाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर घरचया गणपतीचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये शिल्पा आपल्या मुलांसोबत घरच्या गणपतीसमोर बसली आहे.
निल नितीन मुकेशच्या घरी देखील गणरायाचे आगमन झाले असून त्याने पारंपारिक वेशभूषेतील आपल्या मुलीसोबतचा फोटो शेअर केला आहे.
महाराष्ट्राच्या लाडका रितेश देशमुखच्या घरी बाप्पाची प्राणप्रतिष्ठापणा करण्यात आली. त्याने आपल्या दोन मुलांचे मत्र पठण करतानाचे फोटो शेअर केले आहे.
सोहा अली खानने देखील आपल्या लाडक्या लेकीसोबतचा बाप्पाचा फोटो शेअर केला आहे.
नेहा धुपीयाने देखील आपल्या मुलीचा बाप्पासह एक फोटो शेअर केला आहे.