Mother's Day 2021 : नवजात बालकांच्या साथीनं 'या' सेलिब्रिटी साजरा करत आहेत 'मदर्स डे'
'मदर्स डे' अर्थात मातृदिनाच्या निमित्तानं प्रत्येकजण त्यांच्या जीवनात महत्त्वाचं स्थान असणाऱ्या आईला आणि मातृतुल्य प्रत्येकालास शुभेच्छा देताना दिसत आहे. यंदाच्या वर्षी सेलिब्रिटी वर्तुळातूनही अनेक प्रसिद्ध चेहरे हा दिवस साजरा करणार आहेत, तेसुद्धा त्यांच्या नवजात बालकांसोबत. चला तर मग सर्वच मातांना या 'मदर्स डे'च्या शुभेच्छा देत पाहूया या सेलिब्रिटी मॉम आॉहेत तरी कोण...
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअभिनेत्री अमृता राव आणि आरजे अनमोल या सेलिब्रिटी जोडीच्या जीवनात 2020 नोव्हेंबर महिन्यात एका मुलाचं आगमन झालं. यंदा अमृता तिच्या लाडक्या लेकासह हा दिवस साजरा करत आहे.
अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटपटू विराट कोहली यांच्या जीवनात जानेवारी महिन्यात एका चिमुकलीचं आगमन झालं. त्यामुळं यंदाचा मदर्स डे अनुष्कासाठी खास आहे.
अभिनेत्री करीना कपूर खान ही दुसऱ्यांचा आई झाली आहे. त्यामुळं तिच्या आनंदात खऱ्या अर्थानं दिवगुणित वाढ झाली असून, ती यंदा तिच्या दोन्ही मुलांसोबत हा दिव साजरा करत आहे.
गायिका हर्शदीप कौर आणि तिचा पती, मनकित सिंह यांच्या नात्यात मार्च 2021 मध्ये एक नवा पाहुणा आला. याच चिमुकल्या पाहुण्यासोबत, म्हणजेच आपल्या मुलासोबत हर्शदीप मदर्स डे साजरा करत आहे.
बिग बॉस फेम नताशा स्टॅन्कोविक आणि क्रिकेटपटू हार्दिक पांड्या या जोडीनं जुलै 2020 मध्ये त्यांच्या मुलाचं स्वागत केलं. त्यामुळं नताशाही यंदा पहिल्यांदाच हा खास दिवस तिच्या मुलासमवेत साजरा करत आहे.