Dipali Sayyad Birthday Special : दीपाली सय्यदचा मालिकांपासून सुपरहिट चित्रपटापर्यंतचा अभिनयप्रवास

संग्रहित छायाचित्र

1/9
सदाबहार मराठमोळी अभिनेत्री दीपाली सय्यदचा आज वाढदिवस आहे. मालिकांपासून सुपरहिट चित्रपटापर्यंत तिचा अभिनयप्रवास थक्क करणारा आहे.
2/9
सुरुवातीपासून दीपालीला अभिनेत्री व्हायचं होतं. यासाठी तिने खूप मेहनतही घेतली.
3/9
दीपालीने नालंदा विद्यापीठातून फाईन आर्ट्सची पदवी घेतली आहे.
4/9
अभिनय क्षेत्रातील तिचा प्रवास मालिकांमधून सुरु झाला. बंदीनी, समांतर या तिच्या सुरुवातीच्या मालिका आहेत.
5/9
दीपालीने जाऊ तिथं खाऊ, चश्मेबहाद्दर, लग्नाची वरात लंडनच्या दारात असे अनेक हिट चित्रपट दिले.
6/9
दीपाली उत्तम नृत्यांगणा असून जत्रा या चित्रपटातील ये गो ये मैना.. हे तिचं गाणं आजही फेमस आहे.
7/9
करायला गेलो एक, लाडी गोडी, मला एक चानस हवा, ढोळकीच्या तालावर, वेलकम टू जंगल, हे मिलन सौभाग्याचे, माझ्या नवऱ्याची बायको, उचला रे उचला, काय करु न कसं करु, दुर्गा म्हंत्यात मला, काळशेकर आहेत का?, मास्तर एके मास्तर, मुंबईचा डबेवाला, अशा मराठी चित्रपटातील तिच्या भूमिका गाजल्या.
8/9
दीपालीने राजकारणातही आपलं नशीब आजमावून पाहिलं. मात्र, त्यात तिला यश मिळालं नाही.
9/9
दीपालीने 2014 साली अहमदनगर मतदार संघातून निवडणूक लढवली होती. मात्र, त्यात त्यांचा पराभव झाला. (सर्व फोटो दीपाली सय्यद सोशल मीडिया साभार)
Sponsored Links by Taboola