PHOTO : हिरवी साडी, सिंदूर अन् सोबत करण कुंद्रा! चाहते विचारतायत ‘तेजस्वीने लग्न केले की काय?’
अभिनेता करण कुंद्रा आणि अभिनेत्री तेजस्वी प्रकाश यांना टीव्हीचे ‘पॉवर कपल’ म्हटले जाते. ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडल्यानंतर करण आणि तेजस्वी सतत एकत्र स्पॉट होतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरात्रंदिवस कामात व्यस्त असतानाही दोघेही एकमेकांसाठी वेळ काढायला विसरत नाहीत. जेव्हाही या दोघांना वेळ मिळतो, तेव्हा ते एकमेकांना भेटायला जातात.
अलीकडेच, डान्स दिवानेच्या सेटवर, करण कुंद्राचा तेजस्वी प्रकाशसोबत फोनवर बोलत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता आणि काही वेळातच तेजस्वी प्रकाश करण कुंद्राच्या सेटवर नागिन लूकमध्ये दिसली.
तेजस्वी प्रकाश ‘नागिन’च्या शूटिंगमधून वेळ काढून, बॉयफ्रेंड करण कुंद्राच्या शोच्या सेटवर पोहोचली. यादरम्यान दोघेही एकमेकांच्या एकमेकांचा हात पकडून जाताना दिसले.
दोघांचे हे फोटो सोशल मीडियावर येताच आगीसारखे व्हायरल झाले असून, या फोटोंवर कमेंट करताना चाहते त्यांना ‘पॉवर कपल’चा टॅगही देत आहेत.
यादरम्यान, तेजस्वी प्रकाश हिरव्या रंगाची साडी परिधान करून सुंदर दिसत आहे. तर, करण कुंद्रा देखील हिरव्या आणि पांढर्या कॉम्बिनेशनमध्ये खूप डॅशिंग दिसत आहे.