Karan Deol And Drisha Acharya Wedding Reception Photos : करण-द्रिशाच्या रिसेप्शन पार्टीला बॉलिवूडकरांची मांदियाळी; 'या' कलाकारांनी लावली हजेरी
बॉलिवूड अभिनेता सलमान खानने करण देओल आणि द्रिशा आचार्य यांच्या रिसेप्शन पार्टिला हजेरी लावली होती.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकरण देओल आणि द्रिशा आचार्यच्या रिसेप्शन पार्टीत आमिर खानदेखील सहभागी झाला होता.
आपल्या लाडक्या नातवाच्या लग्नात धर्मेंद्र खूपच आनंदी दिसून आले.
करण आणि द्रिशाच्या लग्नसोहळ्यात सुनील शेट्टीचा एक वेगळा अंदाज पाहायला मिळाला.
करण आणि द्रिशा आचार्यच्या रिसेप्शनमधील जॅकी श्रॉफचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये ते हात जोडून नमस्कार करताना दिसत आहेत.
अनुपम खेर यांनीदेखील करण आणि द्रिशाच्या लग्नसोहळ्याला हजेरी लावली आहे.
शत्रुघ्न सिन्हा आपल्या लेकासह करण आणि द्रिशाच्या रिसेप्शनला उपस्थित होते.
बॉलिवूड सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते प्रेम चोप्रा आपल्या पत्नीसह करण आणि द्रिशाच्या रिसेप्शनला उपस्थित होते.
सनी देओलच्या 'गदर' सिनेमाचे दिग्दर्शन अनिल शर्मायांनीदेखील मुलगा उत्कर्ष शर्मासह करण आणि द्रिशाच्या रिसेप्शनला हजेरी लावली.
सुभाष घईदेखील करण देओल आणि द्रिशा आचार्यच्या रिसेप्शनला उपस्थित होते.