अजित पवारांनी केले तुकोबारायांच्या पालखीचे सारथ्य
राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी बारामती शहरात दाखल झालेल्या श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पालखीचे उत्साहात स्वागत केले. (फोटो - मल्लिकार्जुन हिरेमठ)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवारकऱ्यांच्या आग्रहास्तव अजित पवार यांनी पालखी रथाचे सारस्थ केले.. (फोटो - मल्लिकार्जुन हिरेमठ)
यावेळी अजित पवारांनी वारकऱ्यांसोबत फुगडी खेळण्याचा आनंद घेतला.. (फोटो - मल्लिकार्जुन हिरेमठ)
यावेळी लहानपणापासून आपण बैलगाडी चालवलेली आहे आणि अनेक वर्षांपूर्वी ही बैलगाडी चालवली होती मात्र आता मानाच्या पालखीच्या रथाचे सारथ्य मिळाल्यामुळे आपल्याला मनापासून आनंद झाल्याचे अजित पवार यांनी सांगितले... (फोटो - मल्लिकार्जुन हिरेमठ)
आज बारामतीत दाखल झालेल्या संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात सपत्नीक सहभागी झालो. तुकोबांच्या चरणी नतमस्तक झालो. वारकरी बांधवांचे मनापासून स्वागत केले, असे ट्वीट अजित पवार यांनी केले. (फोटो - मल्लिकार्जुन हिरेमठ)
बारामतीमध्ये संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांची पालखी आज मुक्कामी आहे. (फोटो - मल्लिकार्जुन हिरेमठ)