Kangana Ranaut Bday Special: घरातून पळ काढला आणि मुंबई गाठली जाणून घ्या कंगनाच्या आयुष्याशी संबंधित काही रंजक गोष्टी!
कंगना रणौत, तिच्या स्पष्टवक्ते विधानांसाठी आणि बेफिकीर शैलीसाठी प्रसिद्ध आहे, आज लाखो लोकांच्या हृदयावर राज्य करते. (photo:kanganaranaut/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमायानगरी मुंबई प्रत्येक लहान-मोठ्या शहरात राहणाऱ्या लोकांना आकर्षित करते. कंगनानेही लहानपणापासूनच स्वप्न पाहिलं होतं की तीही अभिनेत्री होईल. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कंगनाने आपल्या कुटुंबाच्या विरोधात जाऊन लहान वयातच घरातून पळ काढला आणि मुंबई गाठली. (photo:kanganaranaut/ig)
त्यावेळी लहानशा गावातली मुलगी एके दिवशी बॉलिवूडची 'क्वीन' म्हणून ओळखली जाईल, असा विचारही कुणी केला नसेल.(photo:kanganaranaut/ig)
हिमाचल प्रदेशातील भांबला गावात 23 मार्च 1987 रोजी जन्मलेल्या कंगनाच्या कुटुंबाचा फिल्म इंडस्ट्रीशी कोणताही संबंध नाही.(photo:kanganaranaut/ig)
परंतु अभिनयाची तिची आवड इतकी होती की तिने आपल्या कुटुंबाविरुद्ध बंड केले. (photo:kanganaranaut/ig)
याचाच परिणाम म्हणजे आतापर्यंत तिने 4 राष्ट्रीय पुरस्कार आपल्या नावावर केले आहेत. (photo:kanganaranaut/ig)
कंगनाच्या बिझनेसमन वडिलांची इच्छा होती की आपल्या मुलीने डॉक्टर व्हावे, तर कंगनाच्या डोळ्यात दुसरी स्वप्ने होती. अशा परिस्थितीत ती 15-16 वर्षांची असताना घरातून पळून मुंबईत आली आणि मॉडेलिंग करू लागली.(photo:kanganaranaut/ig)
चित्रपट घराण्यातील नसल्याने तिला चित्रपटात काम मिळवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला.
वयाच्या 17 व्या वर्षी, तिला पहलाज निहलानी दिग्दर्शित 'आय लव्ह यू बॉस' या चित्रपटात कास्ट करण्यात आले, परंतु काही कारणास्तव तिने या चित्रपटातून माघार घेतली आणि चित्रपट रद्द करण्यात आला.