IPL 2024 DC vs PBKS Live Updates पंजाबच्या फलंदाजांनी आज कहर केल्यास दिल्लीच्या अडचणी वाढणार; पाहा 3 शिलेदारांची नावं!
IPL 2024: PBKS vs DC Live Updates: पंजाबच्या संघात असे अनेक फलंदाज आहेत जे दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांपुढे अडचणी निर्माण करू शकतात.
PUNJAB KINGS
1/9
आयपीएलमध्ये आज पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे संघ आमनेसामने येणार आहेत.
2/9
शिखर धवनच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्जसाठी दिल्ली कॅपिटल्सचे आव्हान सोपे नसेल. पण या संघात असे अनेक फलंदाज आहेत जे दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांसाठी अडचणी निर्माण करू शकतात.
3/9
तथापि, पंजाब किंग्जच्या त्या 3 फलंदाजांवर एक नजर टाकू जे दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांसाठी कठीण आव्हान असू शकतात.
4/9
जॉनी बेअरस्टो- अलीकडेच भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत जॉनी बेअरस्टोची कामगिरी निराशाजनक होती. हा यष्टीरक्षक फलंदाज अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकला नाही. पण जॉनी बेअरस्टो लवकरच फॉर्मात परतेल अशी पंजाब किंग्सला आशा आहे. जॉनी बेअरस्टो त्याच्या झंझावाती फलंदाजीसाठी ओळखला जातो. हा इंग्लिश फलंदाज सहजतेने चौकार आणि षटकार मारण्यासाठी ओळखला जातो. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांना जॉनी बेअरस्टोपासून सावध राहावे लागणार आहे. जॉनी बेअरस्टोचा फॉर्म परतल्यास काम केले तर ऋषभ पंतच्या संघाच्या अडचणीत वाढ होणार हे नक्की.
5/9
लियम लिव्हिंगस्टोन- लियम लिव्हिंगस्टोनची गणना जागतिक क्रिकेटमधील सर्वात धोकादायक फलंदाजांमध्ये केली जाते. या फलंदाजामध्ये मोठे फटके सहज मारण्याची क्षमता आहे, त्यामुळे तो कोणत्याही संघासाठी अडचणीचा ठरू शकतो. जर आपण लियम लिव्हिंगस्टोनच्या आयपीएल कारकिर्दीवर नजर टाकली तर त्याने आतापर्यंत 32 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 156.6 च्या स्ट्राइक रेटने आणि 29.57 च्या सरासरीने 828 धावा केल्या आहेत. यासोबतच त्याने आयपीएलमध्ये 6 वेळा पन्नास धावांचा टप्पा ओलांडला आहे.
6/9
जितेश शर्मा- पंजाब किंग्जचा यष्टीरक्षक फलंदाज जितेश शर्मा त्याच्या झंझावाती फलंदाजीसाठी ओळखला जातो. जितेश शर्माच्या आयपीएल कारकिर्दीवर नजर टाकली तर त्याने आतापर्यंत 26 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये या फलंदाजाने 159.24 च्या स्ट्राईक रेटने आणि 25.86 च्या सरासरीने 543 धावा केल्या आहेत. याशिवाय त्याने या स्पर्धेत 44 चौकार आणि 33 षटकार मारले आहेत.
7/9
खेळपट्टी कशी असणार?-महाराजा यदाविंद्र स्टेडियममध्ये आयपीएलची पहिलीच मॅच खेळवली जात आहे.यापूर्वी या मैदानावर झालेले इतर सामने कमी धावसंख्येचे झाल्यानं या मैदानावरील पीचला लो स्कोअरिंग पीच म्हणनं चुकीचं ठरणार नाही. टॉस जिंकणाऱ्या संघाला पहिल्यांदा बॅटिंग करण्यात अडचण येणार नाही. फलंदाजांना चौकार षटकार मारण्यात अडचणी येऊ शकतात. या पीचवर गोलंदाज अधिक भेदक मारा करण्याची शक्यता आहे. दिल्लीकडे अक्षर पटेल आणि कुलदीप यादव सारखे दोन आंतरराष्ट्रीय स्पिनर आहेत. जे पंजाबपुढं अडचणी निर्माण करु शकतात.
8/9
पंजाब किंग्सची संभाव्य Playing XI: शिखर धवन (कर्णधार), प्रभसिमरन सिंह, जॉनी बेयरस्टो, लियम लिविंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), सैम कर्रन, ऋषि धवन, हर्षल पटेल, कगिसो रबाडा, राहुल चाहार, अर्शदीप सिंह.
9/9
दिल्ली कॅपिटल्सची संभाव्य Playing XI: डेविड वॉर्नर, पृथ्वी शॉ, मिचेल मार्श, ऋषभ पंत ( कर्णधार आणि विकेटकीपर), ट्रस्टन स्टब्स, ललित यादव, अक्षर पटेल, कुलदीप यादव, ईशांत शर्मा, मुकेश यादव, आंद्रे नॉर्खिया.
Published at : 23 Mar 2024 10:07 AM (IST)