Janmashtami 2024 : यंदा कृष्ण जन्माष्टमीला घरी आणा 'या' खास वस्तू; ग्रहांचा दोष होईल कमी, संपत्तीत होईल भरभराट
भारतात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. जन्माष्टमीचा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी श्रीकृष्णाची मनापासून पूजा केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयंदा जन्माष्टमी 26 ऑगस्टला साजरी केली जाणार आहे. या दिवशी पुढील 7 वस्तू घरी आणल्यास तुम्हाला धनाची कमतरता भासणार नाही.
मोराचे पंख श्रीकृष्णाला फार आवडते. श्रीकृष्णाच्या डोक्यावर नेहमी मोरपंख पाहायला मिळतो. मोर पंख घरात आणल्यास शांतता कायम राहते.
भगवान श्रीकृष्णाला गाईची सेवा करायला फार आवडायचे त्यामुळे या दिवशी तुम्ही गाय आणि वासरूचा फोटो देखील घरी आणू शकता.
जन्माष्टमीच्या दिवशी बाळकृष्णाची मूर्ती घरात आणून पूजा केली जाते. घरासाठी हे अत्यंत शुभ मानले जाते. यामुळे घरात प्रसन्नता निर्माण होते.
श्रीकृष्णाला दही फार प्रिय आहे. जन्माष्टमीच्या दिवशी दह्याचा नैवेद्य श्रीकृष्णाला दाखवल्याने आर्थिक तंगीपासून बचाव होईल.
तुळशीचे रोप हे देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते. घरात तुळशीचे रोप लावल्याने घरात धन-संपत्तीची भरभराट होते.
भगवान श्रीकृष्णाला बासरी खूप प्रिय आहे. या दिवशी घरात बासरी आणल्याने घरात सुख-शांती येईल आणि तुमची रखडलेली कामे पूर्ण होतील.
हिंदू धर्मात शंख अत्यंत शुभ मानले जाते.मंदिरात शंख वाजवल्याने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. यामुळे जन्माष्टमीच्या दिवशी शंख घरी आणू शकता.