Horror Comedy Movies: कमालीचे हॉरर अन् तुफान कॉमेडी, 'हे' 6 प्रसिद्ध चित्रपट पाहिलेत का ?
दिग्दर्शक अमर कौशिक यांनी दिग्दर्शित केलेल्या 'स्त्री 2' या चित्रपटाने बॉक्सऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. या हॉरर तसेच कॉमेडी चित्रपटाने आतापर्यंत 200 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2018 साली प्रदर्शित झालेला 'स्त्री' चित्रपटदेखील सुपरहिट ठरला होता. या चित्रपटात अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर यासारखे दिग्गज कलाकार आहेत.
अभिनेता अक्षय कुमार तसेच अभिनेत्री विद्या बालन यांची प्रमुख भूमिका असलेला 'भूल भुलैया' हा चित्रपट 2007 साली प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट हॉटस्टारवर मोफत उपलब्ध आहे.
2017 साली प्रदर्शित झालेल्या 'गोलमाल अगेन' चित्रपटाचे दिग्दर्शक रोहित शेट्टी असून यात अभिनेता अजय देवगन, तुषार कपूर, अर्शद वारसी, तब्बू यासारखे प्रसिद्घ अभिनेते, अभिनेत्री आहेत. हा चित्रपट प्राइम व्हीडिओवर बघता येईल.
राघव लॉरेंस यांनी दिग्दर्शित केलेला 'लक्ष्मी' या हॉरर तसेच कॉमेडी चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार प्रमुख भूमिकेत दिसला होता. हा चित्रपटा हॉटस्टारवर अगदी मोफत आनंद घेऊ शकता.
नुकताच आलेल्या 'मुंज्या' या चित्रपटाने बॉक्सऑफिसवर 100 कोटींची कमाई केली.