ढिगभर इंटीमेट सीन्समुळे भारतात बॅन झाले 'हे' हॉलिवूडपट; पण OTT अगदी सहज, खुलेआम पाहू शकता!
'द गर्ल विथ द ड्रॅगन टॅटू': या चित्रपटात एक वादग्रस्त विषय मांडण्यात आला होता. ज्यामध्ये लैंगिक छळ आणि हिंसेला प्रोत्साहन देण्याचे आरोप होते. चित्रपटातील अनेक दृश्य खूपच भयानक होती, ज्यामुळे भारतात बंदी घालण्यात आली होती. हा चित्रपट तुम्ही प्राईम व्हिडीओवर पाहू शकता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App'आय स्पिट ऑन युवर ग्रेव्ह': या चित्रपटात एका मुलीची विचित्र कथा दाखवण्यात आली आहे, ज्यामुळे तुमच्या अंगावर काटा येऊ शकतो. हा चित्रपट प्राईम व्हिडीओवर उपलब्ध आहे. चित्रपटातील काही दृश्यांमुळे भारतात प्रदर्शित होण्यास बंदी घालण्यात आली होती.
'फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे': या चित्रपटात अश्लील दृश्य खूपच होती, या कारणास्तव भारतात यावर बंदी घालण्यात आली होती. परंतु, हा चित्रपट नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे.
'द ह्युमन सेंटीपीड': या चित्रपटात एका सायको साइंटिस्टची कथा दाखवण्यात आली आहे. त्यातील अनेक दृश्य हिंसक आणि अश्लील आहेत, त्यामुळे भारतात त्यावर बंदी घालण्यात आली होती. हा चित्रपट प्राईम व्हिडीओवरही उपलब्ध आहे.
'द दा विंची कोड': या चित्रपटावर धर्म चुकीच्या पद्धतीनं दाखवल्याचा आरोप करण्यात आला होता. या कारणास्तव, केवळ भारतातच नव्हे तर इतर काही देशांमध्येही त्यावर बंदी घालण्यात आली होती. हा चित्रपट तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता.
'ब्लू जस्मिन': या चित्रपटात स्मोकिंगचं जोरदार प्रमोशन करण्यात आलं होतं. या कारणास्तव भारतात त्यावर बंदी घालण्यात आली होती. तरीही, तुम्ही हा चित्रपट यूट्यूबवर विनामूल्य पाहू शकता.
'मॅजिक माईक एक्सएक्सएल : या चित्रपटातील बहुतेक दृश्ये अश्लील होती, त्यामुळे या चित्रपटावर भारतात बंदी घालण्यात आली होती. हा चित्रपट तुम्ही जिओ सिनेमावर पाहू शकता.
'इंडियन जोन्स अँड द टेंपल ऑफ डूम' : या चित्रपटात भारतीय सभ्यता आणि संस्कृती चुकीच्या पद्धतीनं दाखवण्यात आली आहे. या कारणास्तव या चित्रपटावर बंदी घालण्यात आली होती. परंतु, हा चित्रपट प्राईम व्हिडीओवर उपलब्ध आहे.