Jejuri Somvati Yatra 2024 : आम्ही भक्त मल्हारीचे... जेजुरीच्या खंडेरायाची आज सोमवती यात्रा; हजारो भाविकांची गर्दी अन् भंडाऱ्याची उधळण

Somvati Amavasya Yatra 2023: जेजुरीच्या खंडोबाची सोमवती यात्रा (Somvati Amavasya Yatra) आज 13 नोव्हेंबरला भरली आहे. सकाळी 7 च्या सुमारास खंडोबा गडावरुन हा पालखी सोहळा सुरू झाला आहे.

Jejuri Khandoba Somvati Amavasya Yatra 2024

1/11
महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा देवाची सोमवती यात्रा आज 2 सप्टेंबरला भरली आहे.
2/11
सकाळी 7 च्या सुमारास खंडोबा गडावरुन हा पालखी सोहळा सुरू झाला आहे.
3/11
महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या खंडोबाची (Khandoba Mandir) जेजुरी (Jejuri) भंडाऱ्यानं न्हाऊन निघाली आहे.
4/11
यळकोट यळकोटचा गजर करत भंडाऱ्याची उधळण करत लाखो भाविक खंडेरायाच्या जेजुरीत (Jejuri Khandoba Yatra) दाखल झाले आहेत.
5/11
सकाळी 11 वाजता खंडोबा देवाच्या पालखीचं प्रस्थान कऱ्हा नदीकडे होणार आहे.
6/11
अंदाजे सायंकाळी साडेचार ते पाच वाजता कऱ्हा नदीवर श्री खंडोबा-म्हाळसादेवीच्या मूर्तींना धार्मिक वातावरणात स्नान घालण्यात येणार आहे.
7/11
या यात्रेसाठी राज्यभरातून जेजुरी गडावर अनेक भाविकांनी गर्दी केली आहे.
8/11
जेजुरी गड फुलांनी सजला आहे आणि भंडाऱ्यात न्हाऊन निघाला आहे.
9/11
सोमवारी अमावस्या येतं असल्यामुळे ही अमावस्या ‘सोमवती अमावस्या’ म्हणून ओळखली जाते.
10/11
खंडेरायाची जेजुरी आज पिवळीधमक झाली आहे.
11/11
खंडेरायाच्या वर्षभर विविध यात्रा भरत असतात, त्यातीलच एक महत्त्वाची म्हणजे ही सोमवती अमावस्या.
Sponsored Links by Taboola