Holi 2024 : तुमच्या आवडत्या नायिकांकडून होळीसाठी 'हेअर आणि स्कीन' केअर टिप्स!
भारतातील प्रत्येकजण होळी या सणाची आतुरतेने वाट पाहत असतो आणि हा रंगांचा उत्सव मोठ्या थाटामाटात पार पडतो. (Photo Credit : ZEE)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयंदा 24 होलिका दहन, तर 25 मार्चला रंगपंचमीचा उत्सव रंगणार आहे. (Photo Credit : ZEE)
रंगपंचमी हा रंगांचा सण आहे, रंग खेळताना आपल्या त्वचेची आणि केसांची काळजी घेणे आवश्यक असते. (Photo Credit : ZEE)
झी मराठीच्या नायिकांनी रंगपंचमीच्या निमित्ताने त्वचेची आणि केसांची काळजी घेण्यासाठी आवश्यक टिप्स शेयर केल्या आहेत. (Photo Credit : ZEE)
'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मधली तुम्हा सर्वांची लाडकी नेत्रा म्हणजेच 'तितिक्षा तावडे' हिचा लग्नानंतरचा पहिला होळीचा सण आहे. तितिक्षाने सांगितले की, ती जेव्हा होळी खेळायला जाते तेव्हा त्वचेवर आणि केसांना कॅब्रेल तेल लावून जाते. असे केल्याने रंग लगेच निघतो आणि त्रासही कमी होतो. (Photo Credit : ZEE)
'अक्षया हिंदळकर' जी 'पुन्हा कर्तव्य आहे' मध्ये वसुंधराची भूमिका साकारत आहे तिने सांगितले, लहानपणी होळी खेळायला जाताना माझी आई मला बसवून केसांना भरभरून तेल लावायची त्यानंतर केस बांधायची आणि त्वचेवर तेल, क्रीम किंवा सनस्क्रीन लावायची. तिला काही रंगांची ऍलर्जी आहे म्हणून ती ऑरगॅनिक रंगांचा वापर करते. (Photo Credit : ZEE)
'नवरी मिळे हिटलरला' मधली 'वल्लरी विराज' सांगते, मी होळी खेळायला जायच्या आधी बेबी ऑइल किंवा खोबरेल तेल लावते ज्याने रंग त्वचेवर चिटकून राहत नाही. केसांना ही तेल लावते आणि छान एक वेणी, बन किंवा पोनी बांधते. होळी खेळून आल्यावर अंघोळ करून क्रीम लावते. जर रंग निघत नसेल तर लिंबू ही लावून रंग काढायचा प्रयत्न असतो. (Photo Credit : ZEE)
'पारू' मधली 'शरयू सोनावणे' हीने सांगितले की होळी खेळताना नैसर्गिक रंगांचा वापर वापर करा. (Photo Credit : ZEE)
'अप्पी आमची कलेक्टर' मधली 'शिवानी नाईक'ने सांगितले,धुळीवंदनच्या दिवशी सकाळी आई-बाबांनी साांगितल्यानुसार मी डोक्यापासून पायाच्या बोटा पर्यंत तेल लावायची. (Photo Credit : ZEE)
'सारं काही तिच्यासाठी' मधील निशी म्हणजे 'दक्षता जोईल' हीने सांगितले की, लहानपणी होळी खेळायला जाण्यापूर्वी माझी आई मला तेल लावून पाठवायची, कारण तेव्हा सोनेरी, भडक रंग , काही जण तर ऑइल पेंट ही लावायचे. होळी खेळून झाल्यावर अंघोळ केल्यानंतर मी मॉइश्चरायझर किंवा तेल लावते, कारण सतत पाण्यात राहिल्यामुळे त्वचा आणि केस कोरडे होतात. (Photo Credit : ZEE)