सोनं सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर! 24 तासात 1000 रुपयांची वाढ, प्रतितोळा सोन्याला मोजावे लागतात 'एवढे' पैसे
चोवीस तासात सोन्याच्या दरात प्रतितोळा एक हजार रुपयांची वाढ झाली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजळगावच्या सुवर्ण नगरीत सोन्याचे दर हे 67000 तर जी एस टी सह 69000 इतक्या विक्रमी उंचीवर जाऊन पोहोचले आहेत.
अमेरिकन फेडरल बँकांनी आपल्या व्याजदरात कपात केल्यानंतर जागतिक पातळीवर गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक सोन्यामध्ये करण्यास सुरुवात केली आहे.
सोन्याच्या मागणीत मोठी वाढ झाली असून गेल्या 24 तासात सोन्याचे दरात प्रतीतोळ्याच्या मागे 1000 रुपयांची वाढ झाली आहे.
जळगावच्या सुवर्ण नगरीत सोन्याचे दर 67000 तर जीएसटीसह हेच दर 69000 रुपये इतक्या उंचीवर जाऊन पोहोचल्याचे पाहायला मिळत आहे.
आगामी काळात अजूनही सोन्याचा दरात वाढ होण्याचे संकेत सोने व्यावसायिकांनी दिले आहेत.
सोन्याच्या दरात मोठी वाढ झाल्याने सर्व सामान्य ग्राहकांच्या आवाक्याच्या बाहेर सोन्याचे दर गेल्याने सोन्याच्या ग्राहकांची संख्या जळगावमध्ये कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे.
मुंबईतील सराफा बाजार उघडताच सोन्याचे प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 68 हजार 900 वर पोहोचला आहे.
सोन्याचे दर वाढल्यानं ग्राहकांच्या खिशाला चांगलीच कात्री लागत आहे.
जागतिक बाजारातही सोन्याच्या दरात वाढ होत असल्याचं चित्र दिसत आहे.