किताब, इजाजत ते परिचय, गुलजार यांनी दिग्दर्शित केलेले 'हे' सदाबहार चित्रपट पाहिलेत का?
1977 साली प्रदर्शित झालेल्या आणि गुलजार यांनी दिग्दर्शित केलेल्या 'किताब' या चित्रपटात अभिनेता उत्तम कुमार अभिनेत्री विद्या सिन्हा, राजी श्रेष्ठी प्रमुख भूमिकेत दिसले होते. हा चित्रपट तुम्ही प्राइम व्हीडिओवर बघू शकता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appज्येष्ठ गीतकार गुलजार यांचा 'कोशिश' या चित्रपटात प्रसिद्ध अभिनेता संजीव कुमार तसेच अभिनेत्री जया भादुरी प्रमुख भूमिकेत दिसले होते. हा चित्रपट 1972 साली प्रदर्शित झाला होता. सोनी लिव्हवर या चित्रपट मोफत पाहता येईल.
अभिनेता संजीव कुमार देवेन तसेच वर्मा यांच्या 1982 मध्ये आलेल्या 'अंगूर' चित्रपटात दुहेरी भूमिका होती. तुम्ही हा चित्रपट यू-ट्यूबवर मोफत तर प्राइम व्हिडीओवर सबस्क्रिप्शनसह पाहू शकता.
ज्येष्ठ गीतकार गुलजार यांनी दिग्दर्शित केलेला 'इजाजत' हा चित्रपट 1987 साली प्रदर्शित झाला. या चित्रपटात नसरुद्दीन शाह आणि अनुराधा पटेल यासारखे दिग्गज कलाकार होते. हा चित्रपट यू-ट्यूबवर मोफत पाहू शकता.
1975 साली प्रदर्शित झालेल्या 'आंधी' चित्रपटाचे गाणे सुपरहिट झाले होते. या चित्रपटात अभिनेता संजीव कुमार तसेच सुचिता सेन यासारखे कलाकार दिसले होते. हा चित्रपट यू-ट्यूबवर मोफत बघता येईल.
1972 साली प्रदर्शित झालेल्या 'परिचय' या चित्रपटाची कथा लोकांना खूप आवडली होती. जितेंद्र आणि जया भादुरी सारखे दिग्गज कलाकार त्यात दिसले. या चित्रपटाची कथा तुमच्या हृदयाला भिडेल. हा चित्रपट तुम्ही प्राइम व्हिडिओवर पाहू शकता.
ज्येष्ठ गीतकार गुलजार यांनी दिग्दर्शित केलेला 'नमकीन' हा चित्रपट 1982 साली प्रदर्शित झाला. या चित्रपटात प्रसिद्ध अभिनेता संजीव कुमार, शबाना आजमी तसेच अभिनेत्री शर्मिला टागोर यासारखे कलाकार दिसले आहेत.